scorecardresearch

Premium

पोळ्यावर दुष्काळ, महागाईचे सावट; अल्पप्रतिसादामुळे दुकानदारांमध्ये निराशा

यंदा असलेली दुष्काळी परिस्थिती, काही दिवसांपूर्वी असलेला लम्पी आजार आणि महागाईच्या सावटामुळे पोळा सणाच्या उत्साहावर सावट आहे.

bailpola celebration
विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणार्या सर्जा-राजाचा पोळा सण गुरुवारी साजरा होत आहे. मात्र यंदा असलेली दुष्काळी परिस्थिती, काही दिवसांपूर्वी असलेला लम्पी आजार आणि महागाईच्या सावटामुळे पोळा सणाच्या उत्साहावर सावट आहे. खरेदीलाही फारसा उत्साह दिसून आलेला नाही. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

Attempt of self immolation Buldhana district
युवकांच्या ‘आत्मदहना’ने गाजला प्रजासत्ताकदिन! पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ!
winter cold marathi news, winter cough marathi news, winter fever marathi news
Health Special: हिवाळ्यात वाढणारा कफ व होणाऱ्या सर्दी- तापामागची कारणे काय?
Ram temple will make Uttar Pradesh rich reports SBI Research
राम मंदिरामुळे उत्तर प्रदेश होणार धनवान, एसबीआय रिसर्चचा अहवाल; राज्याला चार लाख कोटींचे उत्पन्न मिळणार
Increase in turdal prices due to fall in production
तूरडाळीची उसळी,दर २०० रुपयांवर; उत्पादनातील घटीचा परिणाम

वर्षभर अन्नदात्यासोबत शेतात राबणाऱ्या सर्जा- राजाला एक दिवस विश्रांती मिळणारा सण म्हणजे पोळा. शेती यांत्रिकी झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे आता बैलांचे प्रमाणही कमी झाले आहे. असे असले तरी पोळा सणाला शेतकऱ्यांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात अजूनही पोळ्याचा उत्साह टिकून आहे. यावर्षी मात्र चित्र बदलले आहे. वाढती महागाई आणि दुष्काळाचे पोळ्यावर सावट आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पसरलेल्या लम्पी आजारातून गाय, बैल नुकतेच कुठे सावरु लागले आहेत. लम्पी हा जनावरांच्या त्वचेचा आजार संसर्गजन्य असल्याने पोळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत बैलांनी सहभाग घेतल्यास आजार होण्याची भीती अजूनही शेतकऱ्यांमध्ये आहे.

आणखी वाचा-नाशिक: शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक लाच प्रकरणी ताब्यात

नांदगाव, येवला तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विविध वस्तूंच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. बैलांची वेसण ५० रुपये जोड, कासरा ८० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत, मोरखी ६० ते १३०, गोंडा ५० रुपयापुढे असे दर आहेत. वस्तू महाग झाल्या असल्या तरी शेतकरी गरजेपुरत्या खरेदी करीत आहे. दुसरीकडे, शेतीमालाला भाव नाही. दुष्काळी परिस्थिती याचा एकत्रित परिणाम यंदाच्या पोळा सणावर दिसून येत आहे. आतापर्यंत रिमझिम पावसावरच शेतकर्यांनी पेरण्या केल्या. नंतर मात्र पावसाची प्रतीक्षा अजूनपर्यंत कायम आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे

कृषी संस्कृतीमध्ये पोळ्याला विशेष महत्त्व आहे. जमिनीच्या मशागतीपासून पेरणीपर्यंत आणि पेरणीपासून पीक काढण्यापर्यंत शेतकऱ्याला बैलाची मोलाची साथ मिळते. पोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यासाठी घरोघरी पूजेसाठी बाजारात मातीपासून तयार केलेले बैल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drought and inflation effect on bailpola celebration mrj

First published on: 14-09-2023 at 10:44 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×