नंदुरबार – आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने एका आश्रमशाळा अधिक्षिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

शहादा तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींची शैक्षणिक सहल वेरूळ (जि. औरंगाबाद) येथे २९ सप्टेंबर रोजी गेली होती . विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका, अधिक्षिका असे एकूण ३६० जण सात बसमधून सहलीसाठी गेले होते. सहलीदरम्यान आश्रमशाळेतील एक अधिक्षिका आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे हे एकाच बसमधून प्रवास करीत होते. ३० सप्टेंबरला सहल आटोपून परतीच्या प्रवासात रात्री बसमध्ये मुसळेने विनयभंग केल्याची तक्रार एक ऑक्टोबरला सहल परतल्यानंतर संबंधित अधिक्षिकेने प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे केली. यानंतर त्यांनी संबंधित अधिक्षिकेला दामिनी पथकाकडे पाठवले. संबंधित शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची शहादा तालुक्यातून नवापूर तालुक्यात बदली करुन सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. पीडित अधिक्षिकेने गुरुवारी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुसळेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मुसळे यास अटक करण्यात आली आहे.

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर
allahabad high court ani photo
“यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अ‍ॅक्ट घटनाबाह्य”, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; मदरसेही शिक्षण विभागाच्या अखत्यारीत!