राष्ट्रवादीचा पुढाकार 

नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची मनीषा काँग्रेससह शिवसेनेच्या काही नेत्यांनी मध्यंतरी व्यक्त केली आहे. तथापि, भाजपला शह देण्यासाठी तीनही पक्षांना एकत्रित येण्याची गरजही मांडली जाते. या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढतात की परस्परांविरोधात शड्डू ठोकतात यावरही बरेच काही ठरणार आहे. यात राष्ट्रवादीने प्रथमच आपली भूमिका जाहीर केली.

Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
Prithviraj Chauhan
भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह
Sureshdada Patil
शिवसेनेच्या उमेदवारीसाठी सुरेशदादा पाटील यांचे मातोश्रीवर प्रयत्न; भाजपचा घटक पक्ष दुरावणार?

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील कार्यालयात आढावा बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना भुजबळ यांनी आघाडीसाठी सकारात्मक भूमिका मांडली. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास िपगळे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक आदी पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आपली मते मांडली. महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. यावर भुजबळ यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारला जनतेची पसंती असून वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तरीदेखील संपूर्ण जागांवर आपल्याला लढायची तयारी करावी लागणार आहे. इच्छुकांनी आपापल्या वार्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी द्यावी, सहा विभागांत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून जबाबदारीचे वाटप करावे, असे भुजबळ यांनी नमूद केले.

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल; परंतु निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ सध्या कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार आहे.  पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करावी. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.