गावपातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी आदिवासी युवकाचे प्रयत्न

कृषी पर्यटन केंद्राची स्थापना, १३ प्रकारच्या झाडांची, रानभाज्यांची लागवड  

कृषी पर्यटन केंद्राची स्थापना, १३ प्रकारच्या झाडांची, रानभाज्यांची लागवड  

नाशिक : करोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. नोकरी गेल्याने अनेकांनी गावाचा रस्ता धरला. याच काळात आदिवासी पाडय़ावरील अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या हर्षल थविल या युवकाने वेगळी वाट निवडली. नोकरी न करता सभोवतालत्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत कृषी पर्यटन वाढवूत गावपातळीवरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

सुरगाणा तालुक्यातील हर्षलने आपल्या गारमाळ गावात कृषी पर्यटन सुरू केले असून तो वेगवेगळय़ा संकल्पनांवर काम करतो आहे. गावातच काहीतरी करण्याचा ठाम निश्चय करून हर्षद पुन्हा गावी परतला. गावाकडच्या दुष्काळी शेतीकडे दुर्लक्ष न करता उलट आपली अभियांत्रिकी पदवी आणि त्यापोटी मिळणारी नोकरी असे आर्थिक लाभ सोडून गावाकडे येऊन शेतीला नवसंजीवन देण्याचे त्याने ठरविले.

हर्षदला झाडांची आवड असल्याने त्याने सुरुवातीला कॉफी, कोको, अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रुट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, एलिफंट अ‍ॅपल, पेरू, हापूस,सीताफळ, केळी आदी झाडांसह कमळ तसेच कुमुदिनीच्या वेगवेगळय़ा १३ प्रकारांची लागवड केली.

ग्रामीण भागातला हा परिसर नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे.

हर्षदने कृषी पर्यटन सुरु करण्याचे ठरविले. या माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली. हळूहळू छोटे  तलाव, विविध प्रकारची झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी असे उभारुन कृषी पर्यटन केंद्र तयार केले. या दरम्यान त्याला आवड असलेल्या वारली चित्रकलेचा चांगला उपयोग झाला. येथील झाडांवर, भिंतींवर, विविध ठिकाणी वारली चित्रे काढण्यात आली.

यासाठी त्याने समाजमाध्यमाचा वापर करीत हे पर्यटन केंद्र लोकांसमोर आणले. ही संकल्पना नागरीकांनी उचलून धरली असून प्रतिसाद लाभत आहे. अनेक कुटुंब या ठिकाणी भेट देत आहेत.

कलासंग्रहालय उभारण्याचा मानस

शिक्षणानंतर नोकरी न करता कुटुंबासाठी वेळ तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यायचे होते. त्यामुळे कृषी पर्यटनाची संकल्पना सुचली. ग्रामीण भागात निसर्गाने भरभरून दिले असून त्याचा चांगला उपयोग पर्यटनासाठी होतो आहे. हळूहळू या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा तसेच कलासंग्रहालय उभारून इथल्या स्थानिक कलाकारांच्या कलाकृतीना व्यासपीठ मिळवून देण्याचा विचार आहे.

हर्षद थवीलयुवा अभियंता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Efforts of tribal youth to get employment at village level zws

Next Story
मोर्चेकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे कोंडी
ताज्या बातम्या