नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त |eight lakhs ganja farm destroyed police shahada taluka nandurbar | Loksatta

नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त

पोलिसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले.

नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त
नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त

नंदुरबार : शहादा तालुक्यातील सटीपाणी गावच्या परिसरात कापसाच्या शेतात केली जाणारी गांजाची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या शेतातून गांजाची १५० झाडे जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना शहादा तालुका हद्दीतील सटीपाणी गावात एकाने कपाशीच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांचे पथक सटीपाणी गावातील त्या शेताच्या दिशेने मार्गस्थ झाले. शेताकडे पोलीस येत असल्याचे पाहत संशयिताने पलायन केले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र लगतच्या जंगलात तो पळून गेला.

पोलिसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. या शेतात सुमारे ११३ किलोग्रॅम वजनाचे सात लाख ८६ हजार ३३१ रुपये किंमतीची एकूण १५० गांजाची झाडे होती. ही झाडे गुन्ह्याच्या तपासाकामी आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी संशयित गणेश भोसले ( पावरा) याच्याविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नाशिक :लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील लिपिकास अटक

संबंधित बातम्या

Video: इतरांची मिमिक्री करणाऱ्या राज ठाकरेंची अजित पवारांनी केली नक्कल; नाकावरुन रुमाल फिरवत म्हणाले, “काय एकदाचं…”
“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या देत असतील तर…”, संजय राऊतांचे शिंदे गटातील आमदारांना आव्हान
VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान
कांद्याची पिशवी दाखवित शेतकऱ्यांनी वेधलं मुख्यमंत्र्यांचं लक्ष
जणू काही लोकसभा, विधानसभेची निवडणूक ; ‘मविप्र’वर ताब्यासाठी दोन्ही पॅनलकडून शक्तिप्रदर्शन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईः केवळ ११०० रुपयांमध्ये मिळत होते आधारकार्ड, पॅनकार्ड ; वाचा नक्की काय प्रकरण आहे ते…
KBC 14 : “गंभीर सीनच्यावेळी काजोल…” बिग बींनी सांगितला ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा
“माझ्या मते…” वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची सणसणीत चपराक
‘बिग बॉस’शी बोलताना ढसाढसा रडला शिव ठाकरे; वीणाचं नाव घेत म्हणाला, “तिला…”
अक्षय कुमार ‘ओह माय गॉड २’मधून देणार लैंगिक शिक्षणाचे धडे, म्हणाला…