नंदुरबार – एकनाथ शिंदे स्वत:चे भविष्य तयार करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे ते कोणाकडेही भविष्य पाहणार नाहीत, अशी आम्हांला खात्री आहे. उलट तेच भविष्यकाराचे भविष्य सांगतील. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी सांगितल्यास नेता तिथे जात असतो. त्यामुळे ते गेलेही असतील, असा दावा करीत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची पाठराखण केली आहे.

हेही वाचा >>>पदवीधर मतदार नोंदणीत पुरूषांची आघाडी; प्रारुप यादीत एक लाख ५५ हजारहून अधिक मतदार

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

बुधवारी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे अचानक सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात गेले होते. या ठिकाणी त्यांनी पूजाही केली. राजकीय मनोकामनेसाठी अनेक राजकीय व्यक्ती या मंदिरात येत असतात. त्यामुळे शिंदे यांनीही राजकीय भविष्याच्या चिंतेने मंदिरात पूजा केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमिवर येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा >>>नाशिक: प्रभाग रचना बदलाचा सोस, पण मार्गदर्शक सूचनांचा अभाव; महापालिका यंत्रणाही संभ्रमात

यावेळी पाटील यांनी इतरही विषयांवर मत व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. याआधीच आमदारांना सोबत घेवून महाराष्ट्र फिरले असते तर, बिहारमध्ये जाण्याची गरज पडली नसती. उलट तेजस्वी यादव महाराष्ट्रात आले असते. सत्ता असतांना महाराष्ट्रात फिरुन आमदार आणि जनतेच्या समस्या जाणून घेणे आवश्यक होते. तसे न केल्याने आता बिहारमध्ये जाण्याची वेळ आली, असे गुलाबरावांनी सुनावले.मुंबईची लोकसख्या अधिक असल्याने प्रभागरचनेला महिना, दोन महिने लागतातच. त्यामुळे त्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही.बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्रीत केली होती. त्यामुळे आगामी काळात शोषित, वंचितांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एकही गाव काय एक प्रभागही तोडला जाणार नाही. असे कोणी करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर गुलाबरावांनी दिला. खडसे– महाजन दोघांनीही सबुरीने घेण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.