scorecardresearch

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी नंदुरबारमधून १२० बस, शंभर खासगी वाहने रवाना

रात्रीच्या भोजनानंतर या बस मुंबईतील बीकेसीकडे मार्गस्थ होणार आहेत. यामध्ये महिला कार्यकर्त्याचा देखील समावेश आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी नंदुरबारमधून १२० बस, शंभर खासगी वाहने रवाना
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी नंदुरबारमधून १२० बस, शंभर खासगी वाहने रवाना

नंदुरबार : शिंदे गटाच्या मुंबईतील बीकेसी मैदानवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नंदुरबारमधून सुमारे १० हजार शिवसैनिक रवाना होत असून त्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी १२० बस आणि शंभरहुन अधिक खासगी वाहने मुंबईला रवाना होणार असून गावनिहाय कार्यकर्त्यांचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार जिल्ह्यातून कार्यकर्ते नेण्याचे नियोजन करत असून राज्य परिवहन महामंडळाच्या १२० बसची नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येक बसमध्ये ४० कार्यकर्ते राहणार आहेत. स्टीकर आणि झेडे लावून या बस गावनिहाय रवाना करण्यात आल्या आहेत.

रात्रीच्या भोजनानंतर या बस मुंबईतील बीकेसीकडे मार्गस्थ होणार आहेत. यामध्ये महिला कार्यकर्त्याचा देखील समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्या आणि पुढारी हे आपल्या खासगी वाहनात कार्यकर्त्यांसह मुंबईकडे मार्गस्थ होतील. अशी शंभरपेक्षा अधिक खासगी वाहने या बसगाड्यांसमवेत जाणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही गावांमधून पारंपरिक आदिवासी नृत्य करणारे पथकदेखील या मेळाव्यासाठी मुंबईकडे जाणार असल्याने त्यांचा लवाजमा देखील या वाहनांसोबत राहणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या