scorecardresearch

Premium

सुपर ५० उपक्रमात यंदा ११० विद्यार्थी निवडीसाठी परीक्षा, दोन जुलै रोजी चाचणी

जेईई आणि नीट परीक्षेसाठी निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण उपलब्ध करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वतीने या वर्षीही सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

Zilla Parishad nashik
दोन जुलै रोजी निवड चाचणी होणार असून इच्छुकांना अर्ज करण्यासाठी २६ जून ही अंतिम मुदत आहे.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: जेईई आणि नीट परीक्षेसाठी निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण उपलब्ध करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वतीने या वर्षीही सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. मार्च २०२३ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षासाठी ५५ (जेईई) आणि ५५ (नीट) अशा एकूण ११० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता दोन जुलै रोजी निवड चाचणी होणार असून इच्छुकांना अर्ज करण्यासाठी २६ जून ही अंतिम मुदत आहे.

DNB Course Thergaon Hospital
पिंपरी : महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात ‘डीएनबी’ अभ्यासक्रम, राष्ट्रीय परीक्षा बोर्डाची मान्यता
inter state racket
यवतमाळ : ‘नीट’ परीक्षेत डमी उमेदवार बसविणारे आंतरराज्यीय रॅकेट, नांदेडपासून दिल्लीपर्यंत सूत्रधार
CBSE, Teacher Eligibility Examination 2023, CTET
निकाल जाहीर! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची शिक्षक पात्रता परीक्षा
nashik zilla parishad, malnutrition in nashik district, 89 health servants appointed, malnutrition free nashik
नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी स्तनपान, पोषणावर भर, आरोग्य सेवक प्रशिक्षणासाठी ८९ जणांची निवड

पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी सुपर ५० उपक्रम राबवला होता. ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात दोन जुलै रोजी निवड परीक्षा राबविली जाणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज पंचायत समितीतील गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करावा. प्रत्येक तालुक्यात परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे.

आणखी वाचा-नेमेचि वीज पुरवठा खंडित, मालेगावातील खासगी वीज कंपनीवर मनमानीचा ठपका

या उपक्रमासाठी मार्च २०२३ मधील १० वीची परीक्षा ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश घेणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याच्या पालकांच्या उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख रुपये असावी. उत्पन्नाचा दाखला ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध असावा. अधिवास (डोमिसाईल ) प्रमाणपत्र सादर करावे लागेल. विद्यार्थ्याचा अधिवास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी पात्र नाहीत.अनुसूचित जाती, जमाती या सामाजिक प्रवर्गाच्या विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असावा. अपंग विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील. या परीक्षेत अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरुपात करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Examination for selection of 110 students this year in super 50 initiative mrj

First published on: 14-06-2023 at 11:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×