ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भाऊ चौधरी आणि त्यांचे निकटवर्तीय सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये धक्का बसला असून संजय राऊतांनाच शिंदे गटाचं हे प्रत्युत्तर मानलं जात आहे. भाऊ चौधरी हे संजय राऊतांचे खास समर्थक म्हणून मानले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाऊ चौधरी आणि सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना भाऊ चौधरी यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

संजय राऊतांचे समर्थक

भाऊ चौधरी संजय राऊतांचे समर्थक म्हणून परिचित होते. डोंबिवलीत असताना त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची पदं आणि जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा होती. मात्र, संजय राऊतांमुळे यासंदर्भात कुणी उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली नसल्याचं सांगितलं जातं. मात्र, आता त्याच भाऊ चौधरींनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हा संजय राऊतांना आणि ठाकरे गटालाही धक्का मानला जातो आहे.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

“उद्धव ठाकरेंना अनेक निवेदनं दिली, पण…”

दरम्यान, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाऊ चौधरी यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “शिवसेनेत गेली ३२ वर्षं मी काम करतोय. शिवसेनेचा गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि डोंबिवलीचा शहर प्रमुख म्हणून काम करत असताना पक्षानं ज्या ज्या ठिकाणी मला जबाबदारी दिली असेल, त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही निवेदनं दिली. पण त्यातलं एकही काम मार्गी लागलं नाही”, असं भाऊ चौधरी म्हणाले.

“आरोप-प्रत्यारोप होणारच आहेत, पण मी…”

“गेल्या ५-६ महिन्यांत एकनाथ शिंदेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा नाशिकमध्ये प्रत्येकाची आढावा बैठक घेतली आणि विकासात्मक कामं करण्याचा प्रयत्न केला आहे. इथून पुढे मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. पण मी माझ्या कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन”, असंही ते म्हणाले.

डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली घोषणा

“नागरिकांच्या काही सरकारकडून अपेक्षा असतात. कामं व्हायला हवी असतात. कार्यकर्ते जेव्हा आमच्याकडे काही कामं घेऊन येत असतात, त्यांची कामं जर झाली नाहीत, तर तो कार्यकर्ता म्हणून लोकांना समाजात जाताना काय सांगेल? गेल्या तीन-चार महिन्यांत एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी जे काही निर्णय घेतले, त्या निर्णयांमुळे प्रभावित होऊन आम्ही शिंदे गटात प्रवेश केला”, असं भाऊ चौधरींनी नमूद केलं.