नाशिक : शनिवारी मध्यरात्री नाशिक -गिरणारे रस्त्यावरील पुलावरुन गोदावरी नदीपात्रात वाहन कोसळून एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूरपुढे हॉटेल गंमत जंमत ओलांडल्यानंतर गोदावरी नदीवर पूल आहे. शनिवारी मध्यरात्री या पुलाचे कथडे तोडत चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळले. या अपघातात नितीन कापडणीस यांचा मृत्यू झाला. हेही वाचा.नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोरांवर कारवाई, एक लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा अभियंता जाळ्यात किरण कदम, योगेश पानसरे (रा. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात याविषयी माहिती दिली. वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.