scorecardresearch

नाशिक: मुलीचा खून करणाऱ्या पित्यास अटक

वारंवार किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा संताप अनावर झाल्याने पित्यानेच मुलीचा गळा आवळून खून केला.

crime 22
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

नाशिक: वारंवार किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा संताप अनावर झाल्याने पित्यानेच मुलीचा गळा आवळून खून केला. शहरातील एक्स्लो पॉइंटजवळील रामकृष्ण नगरात ही घटना घडली. ज्योती भारती (२४) ही घरात झालेल्या किरकोळ भांडणावरून घर सोडून निघून जात असे. याचा तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत असे. काही दिवसांपासून ज्योती आणि तिचेे वडील यांच्यात लग्नावरून वाद सुरू होते.

ज्योतीने पुन्हा घर सोडून जाण्याची धमकी दिल्याने वडील रामकिशोर भारती यांचा राग अनावर होऊन त्यांनी ज्योतीचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, उपनिरीक्षक संदीप पवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. याप्रकरणी संशयित रामकिशोर याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 16:30 IST