नंदुरबार जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची धुरा असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अग्निशमन यंत्राची (सिलिंडरची) मुदत संपून दोन महिन्याचा कालावधी उलटला असला तरी त्याचे पुनर्भरण झाले नसल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १० किलो क्षमतेचे २४ सिलिंडर ठिकठिकाणी ठेवण्यात आले आहेत. या सिलिंडरचे दरवर्षी पुनर्भरण करावे लागते. एक वर्षाच्या मुदतीत त्यातील गॅस अथवा पावडरची तीव्रता कमी होत असल्याने पुनर्भरण करणे आवश्यक असते. जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या सिलिंडरची मुदत संपून दिड महिना उलटत आला असला तरी त्यांचे पुनर्भरण झालेले नाही. याआधी जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायकांच्या दालनात झालेल्या दुरुस्तीनंतर वायरींग चुकीच्या पद्धतीने दाबल्याने आग लागली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंडर कायम तयार असणे महत्वाचे ठरते.

हेही वाचा- नाशिक, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांविरुध्द कारवाईचे संकेत

abhay daga upsc marathi news, abhay daga upsc latest marathi news
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

मुळातच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा इतर कार्यालयांची परिस्थिती काही फार वेगळी नाही. अनेक कार्यालयात देखील अशाच पद्धतीने अग्निशमन सिलिंडरची मुदत संपली असली तरी त्याचे पुनर्भरण झालेले नाही. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तत्काळ कारवाई करुन या सिलिंडरचे पुनर्भरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.