नाशिक : इडलीचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीकडून पाच लाख आठ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा आणि ३३०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. संशयित बनावट नोटा विक्री करीत असल्याचा संशय आहे.मलायारसन मदसमय (३३, मूळ कायथर पन्नीकार कुलूम तुदूकुडी, तामिळनाडू) असे या संशयिताचे नाव आहे. भारतनगर भागात त्याला पकडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ४० बनावट नोटा आणि दोन हजार रुपयांच्या २४४ बनावट नोटा आढळल्या. या नोटा विक्री करण्यासाठी संशयिताने बाळगल्या होत्या. बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या खऱ्या असल्याचे भासवून वापरणे व बाळगल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five lakh fake notes seized from idli seller in nashik tmb 01
First published on: 07-10-2022 at 11:33 IST