नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असणाऱ्या चार जणांनी आत्महत्या केली. तिघांनी गळफास घेतला तर एका महिलेने पेटवून घेत आत्महत्या केली. या चारही जणांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

पहिली घटना शिवाजी चौकातील निसर्ग गार्डन रो हाऊसलगत घडली. येथील बंगल्याच्या भांडारगृहाच्या खोलीत राहुल मोरे (४६, सायखेडे रुग्णालयामागे, इंद्रनगरी) यांनी छताच्या पाईपला दोरी बांधून गळफास घेतला. याबाबत सुहास महाले यांनी दिलेल्या माहितीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसरी घटना श्रमिकनगर भागात घडली.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड

हेही वाचा >>> नाशिक : जादूटोणा विरोधी कायदा अधिक कठोर करावा, अंनिसची मागणी

श्रीजी हाईट्समध्ये राहणारे विनोद बोरसे (३२) यांनी घरातील पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर सतीश शेलार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याच परिसरातील रेखाबाई बागले (३८, अशोकनगर) यांनी राहत्या घरात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. त्यात त्या ६० टक्के भाजल्या. मुलगा अक्षयने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा >>> नाशिक : अंनिसने इतर धर्मीयांनाही दाव्यांविषयी आव्हान द्यावे; साधु, महंतांचे आंदोलन

उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्या आहेत. मंदा सौदे (४०, वाल्मिक मंदिराजवळ, गायकवाड मळा, गोरेवाडी) ही महिला मुद्रणालय आवारात सरपण घेण्यास गेली होती. या ठिकाणी बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या बाबत पती सुभाष सौदे यांनी दिलेल्या माहितीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.