scorecardresearch

नाशिक:इगतपुरीजवळील अपघातात चार जणांचा मृत्यू;मृत ठाणे जिल्ह्यातील रहिवासी

इगतपुरीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर बुधवारी दुपारी टायर फुटल्याने कार दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेत शिरुन दुसऱ्या वाहनाला धडकल्याने चार जणांचा मृत्यू झाला.

nashik accident
इगतपुरीजवळील अपघातात चार जणांचा मृत्यू

इगतपुरीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर बुधवारी दुपारी टायर फुटल्याने कार दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेत शिरुन दुसऱ्या वाहनाला धडकल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलीचा समावेश आहे

हेही वाचा >>>Video: दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; पोलीस तपासावरच सवाल उपस्थित

बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पंढरपूरवाडीसमोर नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारचा पुढील टायर फुटल्याने कार दुसऱ्या मार्गिकेत गेली. मुंब्रा येथून नाशिककडे अपघातग्रस्त वाहन घेऊन जाणाऱ्या टोइंग वाहनावर कार आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातात मनोरमा कौशिक (२८), रणजीतकुमार वर्मा (३४, खडकपाडा, ठाणे), खुशी कौशिक (सहा वर्ष), चालक कबीर सोनवणे (३२, बदलापूर) यांचा मृत्यू झाला. अनुजसिंग हे गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा >>>जळगाव: सायाळची शिकार करणारे चौघे वनविभागाच्या जाळ्यात

अपघाताची माहिती समजताच महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन कार मधील सर्व जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल केले. डॉक्टरांनी चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांसह महिंद्रा कंपनीचे पथक आणि टोल प्लाझाचे कर्मचारी यांनी मदत करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 21:14 IST