पंचवटी, दसक, उंटवाडीमध्ये लवकरच विद्युत दाहिनी

प्रदूषण कमी करण्यासाठी स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार लाकडाऐवजी विद्युत दाहिन्यांवर करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न चालविले असले तरी त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरातील अमरधाममध्ये दररोज साधारणत: ४० पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. यातील केवळ दोन-तीन पार्थिवांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार होतात. उर्वरित सर्व सरण रचून केले जातात. मनपाच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत नऊ महिन्यांत लाकुड व तत्सम खरेदीवर तब्बल सव्वा कोटींचा खर्च झाला आहे. वीज वा गॅस दाहिनीचा अधिक्याने वापर झाल्यास आर्थिक भार कमी होईल. शिवाय लाकडाचा वापर थांबून प्रदूषणाची पातळी कमी करता येणार आहे. त्या अनुषंगाने पंचवटी, दसक व उंटवाडीलगत या तीन सन्मानभूमीत नव्याने वीज दाहिन्या कार्यान्वित केल्या जात आहेत.

हेही वाचा >>>नाशिक : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीला आग, मोठ्या प्रमाणात नुकसान

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी चार विभागातील स्मशानभूमींची पाहणी केली. तीन ठिकाणी नव्याने कार्यान्वित केली जाणारी वीज दाहिनी आणि इतर अमरधाममधील दुरुस्तीची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहरात अंत्यसंस्कारासाठी २६ ठिकाणे असून तिथे एकूण ९२ सरण (बेड) आहेत. काही स्मशानभूमीत सरणाची संख्या कमी आहे. तेथील गरज लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी सरणाची संख्या वाढवली जाईल. काही अमरधामची अंतर्गत स्थिती चांगली नाही. त्या ठिकाणी सुशोभिकरण व उद्यानाची कामे करणे वा तत्सम कामासाठी सामाजिक दायित्व निधीतून मदतीसाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करण्याची सूचना आयुक्तांनी केली.

हेही वाचा >>>मालेगाव: भूईकोट किल्ला अतिक्रमण विरोधातील आंदोलन स्थगित

आयुक्तांनी प्रथम पूर्व विभागातील अमरधाम येथील पारंपरिक, गॅस व विद्युत या तिन्ही पद्धतींची पाहणी करीत दुरुस्तीच्या सूचना केल्या. नंतर पंचवटी अमरधाममध्ये नव्याने सुरु होणाऱ्या वीज दाहिनीच्या कामाची माहिती घेतली. गोसावी, लिंगायत समाजाच्या दफनभूमीची पाहणी केल्यावर त्यांनी नाशिकरोडच्या दसक स्मशान भूमीतील पारंपरिक आणि नवीन विद्युत दाहिनीच्या कामाचा आढावा घेतला. नवीन नाशिक विभागातील उंटवाडी स्मशानभूमीत सरणाची संख्या वाढविण्याबरोबर फरशा व खांबांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. अमरधाममध्ये प्रवेशद्वार व आतील परीसरात उद्यानासह सुशोभिकरण करुन वातावरण चांगले ठेवण्याकडे लक्ष द्यावे. असे सूचित केले. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे आदी उपस्थित होते. या दौऱ्यात आयुक्तांनी हिरावाडी येथील नाट्यगृह, आडगाव येथील कबड्डी स्टेडियम, स्मार्ट सिटी योजनेतील जलकुंभ, पंडित पलुस्कर सांस्कृतिक भवनच्या कामांची पाहणी करीत ते मुदतीत करण्याचे सूचित केले.

हेही वाचा >>>नाशिक जिल्ह्यात पाच घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास

अनेकांचा कल नाशिक व पंचवटी अमरधामकडे
शहरात अंत्यसंस्कारासाठी २६ ठिकाणे असून सरणासाठी ९२ (बेड्स) आहेत. सर्व विभागात अंत्यसंस्काराची व्यवस्था आहे. पण, अनेकांचा कल नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याकडे असतो. मनपाकडून मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकूड व तत्सम वस्तू उपलब्ध केल्या जातात. शहरात दररोज साधारणत: ४० पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यातील वीज दाहिनीवर केवळ दोन, तीन अंत्यसंस्कार होतात. उर्वरित बहुतांश अंत्यसंस्कार लाकडाचे सरण रचून केले जातात. वीज, गॅस वाहिनीचा वापर वाढविण्यासाठी वेगवेगळ्या भागात वीज दाहिन्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे.

पारंपरिक पध्दतीने धुलीकण, वायू उत्सर्जनात भर
लाकडाचे सरण रचून केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कारांमुळे धुलीकण व वायू उत्सर्जनाचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण अलीकडेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), ऊर्जा व संसाधन संस्था (टेरी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या सहकार्याने झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ही ओळख धुलीकणांसह अन्य वायुंमुळे अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे. उद्योग, वाहतूक, रस्त्यावरील धुळ, वीटभट्ट्या, बांधकाम, स्टोन क्रशर, स्मशानभूमी, बेकरी अशा जवळपास ११ क्षेत्रांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे शहरात हवेतील प्रदूषण वाढण्यास हातभार लागत आहे.