नाशिक – सध्या ग्रामीण भागात लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड झाल्याचा गैरफायदा काही समाजकंटक घेऊ लागले असून लग्न लावून देण्याचे आश्वासन देत पैसे घेऊन मुलाकडील मंडळींना लुबाडण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. अशाच एका प्रकरणात जायखेडा पोलीस ठाण्यात संशयित युवतीसह तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील पराग पगार (२१) या युवकाशी एका महिलेसह विजय मुळे (रा. देऊळगाव) आणि अजून एका व्यक्तीने लग्नासंदर्भात संपर्क साधला.

हेही वाचा >>> शेतीकामाची चिंता विसरा, यंत्रमानव आहे मदतीला – रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तुझे लग्न लावून देतो. दोन लाख रुपये खात्यावर जमा कर, असे विजयने पराग यास सांगितले. परागने पैसे जमाही केले. त्यानंतर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आल्यावर ते पैसेही जमा करण्यात आले. त्यानंतर संशयित युवतीशी परागचा विवाह झाला. युवती नंतर पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. साक्री तालुक्यातील चंद्रकांत ठाकरे, श्रीपूरवडे येथील हर्षल ठाकरे यांच्याशीही संबंधित युवतीने लग्न करुन लग्नानंतर तीन दिवसात ती पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.