girl Student death due to dizziness during Republic Day in Jategaon nashik ssb 93 | Loksatta

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत चक्कर आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

जनता विद्यालयातील नववीच्या वर्गातील पूजा दादासाहेब वाघ (१५) हिला शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ध्वजवंदनासाठी प्रभात फेरीने जात असताना चक्कर आली.

One dies after being hit by an ambulance on the bypass
बाह्यवळण मार्गावर रुग्णवाहिकेच्या धडकेने एकाचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीचा प्रभातफेरी सुरू असतांना चक्कर आल्याने मृत्यू झाला.

जनता विद्यालयातील नववीच्या वर्गातील पूजा दादासाहेब वाघ (१५) हिला शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ध्वजवंदनासाठी प्रभात फेरीने जात असताना चक्कर आली. तिला तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पूजाची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. वाटेतच तिचे निधन झाले.

हेही वाचा – जळगाव : भुसावळ परिसरास भूकंपाचे हादरे, ३.३ रिश्टर स्केल तीव्रता

हेही वाचा – त्रिकूट दुर्घटनेत बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र

पूजाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाला जन्मापासूनच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असे. तिची तपासणी केली असता तिच्या फुफ्फुसाला छिद्र असल्याचे निदान झाले होते, त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. परंतु, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिचे निधन झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात. त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करण्यात येईल, असे सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम पूजाच्या मृत्यूमुळे रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:47 IST
Next Story
जळगाव : भुसावळ परिसरास भूकंपाचे हादरे, ३.३ रिश्टर स्केल तीव्रता