नाशिक – गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गाडून घेत केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, ओबीसी अशा सर्व घटकांना पक्षात आणून त्यांनी भाजपला जनतेचा पक्ष बनविले, राज्यात पक्षाच्या विस्तारात त्यांची अतिशय महत्वाची भूमिका राहिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हेही वाचा >>> “…तर माझी अडीच वर्ष तुरुंगात गेली नसती”, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने छगन भुजबळ भावूक

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”

शनिवारी गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच अनुषंगिक विकास कामांसह उभारलेल्या गोपीनाथ गड या स्मारकाचे लोकार्पण झाले. यावेळी गडकरी यांनी अनेक आठवणींना उजाळा देत मुंडे यांचा संघर्षमय राजकीय जीवन प्रवास अधोरेखीत केला. वंचित, मागासलेल्या घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समर्पित भावनेने काम करणारे गोपीनाथ हे योध्दा होते. १९९२-९३ मध्ये संघर्ष यात्रा काढून त्यांनी महाराष्ट्र जागवला. त्यांच्या प्रयत्नातून १९९५ मध्ये शिवशाहीचे राज्य आले. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामात रिलायन्सची निविदा रद्द करतानाही ते आपल्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे तेव्हा १६०० कोटींची बचत झाली. आजच्या काळातील २० हजार कोटी रुपये वाचल्याचा दाखला गडकरी यांनी दिला.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव 

सिंचन प्रश्नांवर मुंडे यांनी नेहमीच आवाज उठवला. मागासलेल्या भागात पाणी पोहोचविण्याची कामे रेटून नेली. आपण भाजपचा अध्यक्ष झाल्यानंतर केवळ दोन व्यक्तींनाच खाली वाकून नमस्कार केला. त्यात लालकृष्ण अडवाणी व गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता. मुंडे यांचा वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा आणि खासदार प्रीतम यांनाही सर्व क्षेत्रात प्रचंड यश नक्की मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंडे यांचे संघटन कौशल्य, अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्वाचा संदर्भ देऊन त्यांनी अठरापगड जातींसाठी कामे करीत माणसे जोडल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गडकरी व मुंडे यांच्यावर प्रेम होते. ते आम्ही जवळून बघितल्याचेही त्यांनी सांगितले. मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलून टाकणारे नेतृत्व होते. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासोबत त्यांच्या नावे रुग्णालयही उभारले जाईल, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे, माजीमंत्री छगन भुजबळ बाळासाहेब थोरात, उदय सांगळे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.