scorecardresearch

जळगाव जिल्ह्यातील नुकसानीचे आठवड्याच्या आत सर्व पंचनामे पूर्ण करा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

विमा कंपनीच्या कामावर जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

guardian minister of jalgaon district gulabrao patil, farmers loss due to heavy rainfall in jalgaon district
जळगाव जिल्ह्यातील नुकसानीचे आठवड्याच्या आत सर्व पंचनामे पूर्ण करा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश (संग्रहित छायाचित्र)

जळगाव : केळी पीकविम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याबरोबरच पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी आणि इतर पीक क्षेत्रांची स्थळपाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

केळी पीकविमा प्रलंबित नुकसानभरपाई, मागील आठवड्यात झालेले नुकसान या विषयांवर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी व शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. यावर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हेही वाचा : उद्यापासून पुन्हा कांदा कोंडी? केंद्राच्या धोरणास विरोध, लिलावापासून दूर राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

गेल्या आर्थिक वर्षात केळी विमा काढला होता. मात्र, अद्याप नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकर्‍यांना भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. विमा कंपनीने या कामात हलगर्जीपणा करू नये. शेतकर्‍यांना आठवडाभरात नुकसानभरपाई त्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करावी. विमा कंपनीच्या कामावर जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा : सिन्नरमध्ये जिंदालचा नवीन प्रकल्प; पेट्रोलियम उद्योगासाठी सामग्रीची देशात निर्मिती

तापी नदीला आलेला पूर व हतनूर पाणी फुगवट्यामुळे जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, बोदवड, चोपडा व जळगाव या तालुक्यांतील काही भागांतील बहुसंख्य शेतकर्‍यांच्या केळी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात महसूल व कृषी यंत्रणा तत्काळ सक्रिय करण्यात यावी. तलाठी व कृषी सहायकांनी मुख्यालय सोडून न जाता आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×