दरोडा टाकण्यासाठी घरात घुसलेला चोर मंत्र्यानेच पकडून दिला; दादा भुसेंवर होतोय कौतुकाचा वर्षावguardian minister of Nashik Dada Bhuse caught thief in patta area of malegaon | Loksatta

दरोडा टाकण्यासाठी घरात घुसलेला चोर मंत्र्यानेच पकडून दिला; दादा भुसेंवर होतोय कौतुकाचा वर्षाव

मालेगावच्या कलेक्टर पट्टा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे

दरोडा टाकण्यासाठी घरात घुसलेला चोर मंत्र्यानेच पकडून दिला; दादा भुसेंवर होतोय कौतुकाचा वर्षाव
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (संग्रहित छायाचित्र)

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील एका बंगल्यातून दरोडेखोराला पकडलं आहे. हातात पिस्तुल घेऊन दरोडेखोर एका बंगल्यात शिरला होता. पिस्तुलचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मालेगावच्या कलेक्टर पट्टा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ या वाहिनीनं घटनेचं वृत्त दिलं आहे.

“ज्यांनी भारतावर राज्य केलं, आता त्याच ब्रिटनचा..,” ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच दिग्गजांच्या प्रतिक्रिया

मालेगावातील हा परिसर उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. या परिसरात व्यापारी मोठ्या संख्येनं राहतात. दुपारच्या सुमारास महिला घरात एकट्या असताना लूटमार करता येईल, या उद्देशानं दरोडेखोर एका बंगल्यात शिरला होता. या परिसरातून जात असताना दादा भुसेंना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीनं दरोडेखोराला पकडलं.

“आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

पाहा व्हिडीओ –

सध्या हा दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात दरोड्यांच्या घटना ताज्या असतानाच मालेगावात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील नागरिक पोलीस यंत्रणेवर नाराज असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2022 at 08:48 IST
Next Story
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये तंत्रस्नेही कार्यालय; राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयास कॉर्पोरेट वळण