scorecardresearch

नाशिकरोड येथे १४ लाखांचा गुटखा जप्त

राज्यात प्रतिबंधित असलेला साठा आणि वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटचा साठा नाशिकरोड परिसरातील गोदामात करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली.

नाशिकरोड येथे १४ लाखांचा गुटखा जप्त
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अन्न व औषध प्रशासनाने गुटखा, पानमसाला, सुंगधित तंबाखु विरोधात चार-पाच महिन्यांपासून सुरु केलेल्या कारवाईतंर्गत राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा १४ लाखापेक्षा अधिक रकमेचा साठा जप्त करण्यात आला. नाशिकरोड येथे साठवणूक केलेले गोदाम बंद करण्यात आले असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुध्द दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> वाद मिटविण्याविषयी फडणवीसांना सांगितलेच नाही – एकनाथ खडसे यांचा दावा

राज्यात प्रतिबंधित असलेला साठा आणि वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटचा साठा नाशिकरोड परिसरातील गोदामात करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. रविवारी सायंकाळी उशीराने विभागाने शिंदेगाव परिसरात कारवाई करत गोदामातील १४ लाख, ७५ हजार ४७४ रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी सोनू लोहिया, रामविलास लोहिया, मनोज लोहिया, राम लोहिया यांच्याविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गोदाम बंद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या