नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील कौली गावाजवळ डंपरची दुचाकीस्वारांना धडक बसल्याने दोघांचा मृत्यू तर, सहा जण जखमी झाले. घटनास्थळी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पोलीस प्रशासनाने जखमींना खासगी वाहनातून अक्कलकुवा रुग्णालयात हलविले. यामुळे संतप्त नातेवाईकांनी दोन तास महामार्गावर ठिय्या दिला. पोलीस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

अक्कलकुवा तालुक्यातून अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्ग जातो. या महामार्गावर नेत्रंग-शेवाळी दरम्यान सोमवारी कौली गावाजवळ अपघात झाला. बकरी ईद निमित्ताने हमजा शरीफ अक्राणी (१६) आणि रेहान रज्जाक पठाण (१६) हे दुचाकीवरुन नातेवाईकांना भेटण्यास जात होते. सेलंबा येथून निघालेल्या या दुचाकीस्वारांना मागून येणाऱ्या डंपरची धडक बसली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर डंपर चालक पसार झाला.

Three people died in a landslide in Uttarakhand including two from the state
उत्तराखंडमधील भूस्खलनात राज्यातील दोघांसह तिघांचा मृत्यू
A crack has collapsed in Kedarnath and a youth from Jalanya is among the dead
केदारनाथमध्ये दरड कोसळली; तिघांचा मृत्यू, जालन्यातील एका तरुणाचा समावेश
gondia, boy died, drowning, mine,
गोंदिया : मुरमाच्या खाणीतील खड्ड्यात आंघोळ करणे जिवावर बेतले; मुलाचा बुडाल्याने मृत्यू
akola, electrocution
वाशिम : जिवंत वीज तारेला स्पर्श अन् चुलत भावांसह वडिलांचा करुण अंत
Girl dies after being hit by a Citylink bus in nashik
सिटीलिंक बसच्या धडकेने बालिकेचा मृत्यू, आजोबा जखमी
Seven cow and Buffaloes died due to lightning in Pisvali near Dombivli
डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू
buffalo 24 buffaloes got electrocuted and died on the spot
ओढ्यात उतरलेल्या २४ म्हशींचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू
man died, contractor, seat of lift,
उदवाहकाची जागा ठेकेदाराने मोकळी सोडल्याने ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

हेही वाचा…सिक्कीममध्ये नाशिकचे पर्यटक सुखरुप

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमी आणि मयतांना खासगी वाहनातून अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी दोन तासांहून अधिक काळ रास्तारोको केला. पोलिसांनी कुटुंबीय,नातलगांची समजूत काढली. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर आमच्या नातेवाईकांचे प्राण वाचले असते, असे यावेळी मयतांच्या नातेवाईकांने सागितले. मयत दोघेही गुजरातच्या सीमावर्ती भागातील सेलंबा येथील रहिवासी होते.