जळगाव – खड्डेमय रस्त्यांच्या त्रासातून जळगावकरांची लवकरच मुक्तता होणार आहे. शहरातील रस्ते आता काँक्रिटचे होणार असून, त्यासाठी शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात ५० कोटी वितरितही करण्यात आले आहेत. सर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक विभागामार्फत केली जाणार आहेत.

हेही वाचा – नाशिक : राजकीय व्यक्तींकडून अश्लाघ्य भाषेचा वापर वाढलाय, विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली चिंता

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

हेही वाचा – जळगाव : पीक स्पर्धेत जळगावची आघाडी; राज्यस्तरावर दोन, तर विभागीय स्तरावर पाच शेतकऱ्यांची निवड

महापालिका निवडणूक जवळ आल्याने शासनाकडून विकासकामांबाबत घोषणा केल्या जात आहेत. विकासकामे पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधीही सरसावले आहेत. जानेवारीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली होती. जळगावातील रस्त्यांच्या डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने शहरातील रस्तेकामांचे तीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. पैकी शंभर कोटींच्या कामांचा प्रस्ताव मंजूर झाला असून, शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून याबाबतचा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. यात शहरातील सर्व प्रभागांतील उपनगर व कॉलनी भागातील रस्त्यांचा या निधीतून होणाऱ्या कामांत समावेश करण्यात आला आहे. याआधी शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील सहा रस्त्यांसाठी ८५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. अमृत योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. मात्र, ४२ कोटींच्या निधीतून काही कामे मार्गी लागल्यानंतर आता इतर रस्त्यांचीही कामे मार्गी लागणार आहेत.