भाजप-शिवसेनेचा एकमेकांना धोबीपछाड

शहराप्रमाणे ग्रामीणसह आदिवासी पट्टय़ात आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या भाजपच्या धडपडीला नगरपालिका निवडणुकीत काहीअंशी यश आले. १२ ज्योतिर्लिगांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकनगरीची सत्ता भाजपला एकहाती मिळाली. इगतपुरी नगरपालिकेत शिवसेनेच्या गडाला मात्र धक्का देता आला नाही.

Dhangekar Kolhe and supriya Sule sat in front of the stage in the hot sun.
मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल
Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट

भाजप प्रदेशाध्यक्षांपासून आमदार, नाशिक महापालिकेतील नगरसेवक अशी मोठी फौज मैदानात उतरली होती. शिवसेनेचे बडे नेते प्रचारात फिरकले नसताना जातीय समीकरणाची यशस्वी मांडणी करत शिवसेनेने इगतपुरी पालिकेवरील वर्चस्व कायम राखले. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे आमदार करतात. या पक्षाला दोन्ही नगरपालिकांमध्ये साधा भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादीने उमेदवार न देता आधीच हार पत्करली होती.

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्षांला धार चढली आहे. नगरपालिका निवडणुकीत त्यात भर पडली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील या दोन्ही नगरपालिका शिवसेना आणि भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. पुढील राजकारण डोळ्यासमोर ठेवत दोन्ही पक्षांनी डावपेच आखले. भाजपचे इगतपुरीत तर शिवसेनेचे त्र्यंबकेश्वरमध्ये ते फसले. धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्यास अनेक घटकांनी हातभार लावला. अवघे साडेदहा हजार मतदार असणाऱ्या त्र्यंबकच्या निवडणुकीत व्यक्तिगत संबंध महत्त्वाचे ठरतात. यामुळे काही दशकांपूर्वी निवडणुकीत पक्षचिन्हांचाही वापर होत नसे. मागील पंचवार्षिकमध्ये सर्वपक्षीयांच्या आघाडीमुळे कारभाराचा पुरता विचका झाला होता. सहा महिने-वर्षभराच्या अंतराने प्रत्येक पक्षाने नगराध्यक्षपद वाटून घेतले.

घोडेबाजार रंगात आला होता. सत्तेसाठी नगरसेवकांनी उडय़ा मारण्याचा विक्रम नोंदविला. या राजकारणाला वैतागलेल्या मतदारांनी एकाच पक्षाला कौल देत नगरपालिकेत स्थिरता राखण्याचा संदेश दिला आहे. भाजपने पक्षबदलू नगरसेवकांऐवजी नवीन चेहेऱ्यांना संधी दिली. नाशिकमधून यथाशक्ती रसद पुरविली. सर्वपक्षीयांच्या राजकारणाला वैतागलेल्या मतदारांनी मग भाजपच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकले.

गतवेळी नगरपालिकेत शिवसेना-भाजपचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. यंदा भाजपने थेट १४ जागा जिंकून सत्ता काबीज केली. नगराध्यक्षपदी भाजपचे पुरुषोत्तम लोहगावकर विजयी झाले. शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. प्रचारकाळात शिवसेना भ्रमात राहिली. स्थानिक पुरोहितांचे प्रश्न हाताळल्याने त्यांचा पाठिंबा मिळेल असे गृहीत धरले. सेनेचे खासदार, पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकच्या वाऱ्या केल्या. तरी नगराध्यक्षपद निवडणुकीत सेनेचा उमेदवार स्पर्धेतही राहिला नाही. तो थेट चवथ्या क्रमांकावर फेकला गेला. काँग्रेसची त्याहून बिकट अवस्था झाली.

  • इगतपुरी नगरपालिका निवडणुकीत तसाच जोर लावणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांवर शिवसेनेने पाणी फेरले. मागील अडीच दशकांपासून नगरपालिकेत सेनेची सत्ता आहे. ३८०० मिलिमीटर पाऊस होऊनही शहरात आठवडय़ातून तीन दिवस पाणी पुरवठा होतो.
  • नगरपालिकेचे एकही रुग्णालय नाही. रस्त्यांची दुर्दशा झालेली. फारशी विकास कामे न करताही सेनेने सत्ता कायम राखण्याची किमया साधली. राष्ट्रवादीतून आलेल्या फिरोज पठाण यांना भाजपने नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरविले.
  • नगरसेवकपदासाठी पक्षाचे जुने पदाधिकारी-कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी प्रवेश करणाऱ्यांना तिकिटे दिली गेली. या नाराजीचाही फटका बसला. नाराज गटाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला.
  • नगराध्यक्षपदी विजयी झालेले सेनेचे संजय इंदुलकर यांची राजकीय खेळी भाजपसह विरोधकांना नमविण्यात यशस्वी ठरली. इगतपुरीत भाजपचे अस्तित्व नव्हते. स्वतंत्रपणे लढलेली ही त्यांची पहिलीच निवडणूक. गतवेळी आठ नगरसेवक असणाऱ्या राष्ट्रवादीला उमेदवारही देता आले नाही.
  • भाजपला चार जागा मिळाल्या तर काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले. या निवडणुकीच्या माध्यमातून आदिवासी भागात भाजपने आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसला पराभवाचा धक्का

इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या आशा गावित या करतात. परंतु या मतदारसंघातील दोन्ही नगरपालिकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. अर्थात, काँग्रेसची सारी मदार ही ग्रामीण भागातील आदिवासींवर असते. परंतु हा पराभव काँग्रेसला विचार करण्यास भाग पाडणारा आहे.