नंदुरबार – महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात इंडन टिंबर डेपोवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७७ लाख १८ हजार ४३६ रुपयांचे खैराचे ४८० घनमीटर लाकूड जप्त केले. तीन ते चार दिवस गुप्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आली. 

 धुळे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक नीनू सोमराज यांना अक्कलकुवा येथे इंडेन टिंबर डेपो या खासगी वखारीत खैराची अवैधपणे साठवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यांनी या प्रकरणाची खात्री करण्यासाठी दक्षता विभागाच्या धुळे विभागीय वन अधिकाऱ्यास पाठविले होते. २५ जुलै रोजी अधिकाऱ्यांनी इंडेन टिंबर डेपोला भेट दिली असता मोठ्या प्रमाणात खैराचा साठा दिसला. खैर साठ्याची  चौकशी करण्यासाठी तळोदा येथील सहायक वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली २६ जुलै रोजी समिती स्थापन करण्यात आली. या समितीस चौकशीसाठी अधिकचा  कालावधी आवश्यक असल्याने आणि वखार मालकाच्या मागणीनुसार चौकशी लवकर संपविण्याच्या दृष्टीने दक्षता विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सप्टेंबर २०२४ रोजी अन्य एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालानुसार वखार मालकाकडे खैर साठा करण्याचा परवाना असला, तरी प्रत्यक्ष जागेवर ६०८ घनमीटर खैर साठा आढळून आला. त्यापैकी ४७६.८१ घनमीटर खैर अवैध आढळून आले.

What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

हेही वाचा >>>गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

या प्रकरणात प्रथम दर्शनी दोषी आढळून आलेल्या अमलबारी येथील वनपालास निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यासाठी मेवासी (ता. तळोदा) येथील उपवनसंरक्षक यांना नेमण्यात आले आहे. मेवासी येथील उपवनसंरक्षकांनी वखार मालका विरुध्द वनपरिक्षेत्र अक्कलकुवा (परिमंडळ अमलीबारी) येथे  गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ४८० घनमीटर खैर साठा अवैध आढळून आला असून त्याची किंमत सुमारे ७७ लाख १८ हजार ४३६ रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे. खैर साठा जप्त करण्यात आला आहे.