scorecardresearch

Premium

फाॅरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष; धुळ्यात दाम्पत्यासह सात जणांविरुध्द गुन्हा

या अमिषाला भुलून काही जणांनी २२ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ५८ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम या संशयितांकडे दिली.

dhule scam, doubling the money scam in dhule, dhule lure of doubling the money, forex currency market company
फाॅरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष; धुळ्यात दाम्पत्यासह सात जणांविरुध्द गुन्हा (संग्रहित छायाचित्र)

धुळे : फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे गुंतविल्यास दुप्पट लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवित अनेकांकडून ५८ लाख ७५ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पती-पत्नीसह सात जणांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ए. एम.पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हरिश जंगले (३२, शिवाजीनगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे, ह.मु. भुसावळ, जि. जळगाव), शितल जंगले, मधुकर पाटील, नीलिमा पाटील, जितेश पाटील (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), मनोज जंगले (प्लॉट नं. ८, गणेश कॉलनी, भुसावळ, जि. जळगाव) या सात जणांनी फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे गुंतविल्यास भरपूर लाभांश मिळेल, असे आमिष दाखवित लोकांचा विश्वास संपादन केला.

pimpri chinchwad municipal corporation, pcmc seized 68 properties, non payment of property tax
पिंपरी महापालिकेकडून चार दिवसांत ६८ मालमत्ता जप्त; सहा मालमत्तांना ठोकले सील
wardha sp noorul hasan, sp noorul hasan played cricket, back to back sixers
पोलीस अधीक्षकांची कमाल, सिक्सरवर सिक्सर…
Sovereign Gold Bond Scheme 2023-24 Online Purchase
Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची संधी, बाजारातून स्वस्त दरात सोने खरेदी करता येणार
lokmanas
लोकमानस : होईल त्रास; पण एसटी कर्मचाऱ्यांची काय चूक?

हेही वाचा : भुसावळमध्ये पाच टनांपेक्षा अधिक रसायनमिश्रित खवा जप्त; दोघांना अटक

या अमिषाला भुलून काही जणांनी २२ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ५८ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम या संशयितांकडे दिली. हे पैसे फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीत न गुंतविता संशयितांनी अपहार केला, अशी तक्रार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dhule forex currency market company scam with the lure of doubling the money css

First published on: 23-09-2023 at 12:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×