scorecardresearch

Premium

घरगुती गॅसचा काळा बाजार, ४९ सिलिंडर जप्त

घरगुती वापराच्या सिलेंडरमधून रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरून काळा बाजार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथक व मनमाड पोलीसांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.

manmad police, 49 domestic gas cylinders seized, filling lpg gas into auto rickshaw, manmad crime news,
घरगुती गॅसचा काळा बाजार, ४९ सिलिंडर जप्त (संग्रहित छायाचित्र)

मनमाड : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक आणि मनमाड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने शहरातील कीर्तीनगर भागात छापा टाकून घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली. या छाप्यात गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मोटार पंप, वजन काटा व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे ४९ सिलिंडर आणि चारचाकी रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी

farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
police leave encashment
रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Chinese firecrackers worth 11 crore seized from Nhava Sheva port
न्हावा शेवा बंदरातून ११ कोटींचे चायनीज फटाके जप्त, ४० फुटांच्या कंटेनरमधून तस्करी

कीर्ती नगर भागात एका ठिकाणी घरगुती वापराच्या सिलेंडरमधून रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरून काळा बाजार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथक व मनमाड पोलीसांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली व उपरोक्त माल जप्त केला. यातील संशयित फरार असून पोलीस पुढील कारवाई करत आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस भरत असतांना पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. सिलिंडर भरलेली चारचाकी व एक रिक्षाही जप्त करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In manmad 49 domestic gas cylinders seized by police for illegally filling gas into auto rickshaw css

First published on: 06-10-2023 at 13:07 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×