scorecardresearch

Premium

मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळला, इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प

मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

railway overbridge collapsed in manmad, manmad railway overbridge collapsed, british era railway overbridge collpased in manmad,
मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळला, इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक : मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल (ओव्हर ब्रिज) मध्यरात्री खचला असून बुधवारी पहाटे त्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र धुळे-शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्याच गंभीर होणार आहे. या ब्रिटीशकालीन पुलाचा मध्यभाग ढासळला असून यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. पण यामुळे मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : नंदुरबार : मनोरुग्ण रेल्वेच्या विद्युत खांबावर चढला, अन…

Two months of traffic on Mumbra routes including Thane Bhiwandi
ठाणे, भिवंडीसह मुंब्रा मार्गांवर दोन महिने कोंडीचे; मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत परिसरात रुंदीकरणाचे काम
South Mumbai to Thane Coastal Route
दक्षिण मुंबई ते ठाणे सागरी किनारा मार्ग
Inauguration of Palghar to Gujarat phase of Dedicated Freight Corridor Project
मालगाड्यांसाठी मार्ग सुसाट; समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाचे आठवडा खेरीज उद्घाटन
Due to the demand of AC coaches in railways there is a decrease in slipper coaches
रेल्वेत ‘एसी कोच’ला मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’मध्ये घट; मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले…

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी या पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे मागेच संरचनात्मक लेखापरीक्षण झाले होते. मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. अभियंता संघटनेने वळण रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. या परिस्थितीत पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान जुन्या पुलाचा पूर्वेकडील मोठा भाग कोसळला. सुरक्षा कथड्यासह मातीचा ढिगारा खाली गेला. यावेळी पुलावर वाहन नसल्याने दुर्घटना टळली आहे.

पुलाची जबाबदारी टोल कंपनीकडे

पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. गेल्या १५ वर्षांपासून हा पूल एमएमकेपीएल या टोल कंपनीकडे बीओटी तत्वावर हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम काम याच कंपनीकडे होते. हा पूल आणि महामार्ग धोकादायक असून वळण रस्ता करण्यात यावा, अशी बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In manmad british era railway overbridge collapsed traffic jam on indore pune highway css

First published on: 29-11-2023 at 09:33 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×