scorecardresearch

धक्कादायक! ६० वर्षीय दिव्यांग महिलेवर २२ वर्षीय तरुणाकडून बलात्कार

अर्धांगवायूमुळे गेल्या सात वर्षांपासून अंथरूणावर असलेल्या ६० वर्षीय महिलेवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक! ६० वर्षीय दिव्यांग महिलेवर २२ वर्षीय तरुणाकडून बलात्कार
प्रातिनिधीक छायाचित्र

अर्धांगवायूमुळे गेल्या सात वर्षांपासून अंथरूणावर असलेल्या ६० वर्षीय महिलेवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – सशस्त्र दलात मराठी मुलींचा टक्का वाढणार, नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था

नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेला सात वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ती अंथरुणावर खिळून होती. ती एका झोपडीत आपल्या भावाबरोबर राहत होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास महिलेचा भाऊ घरी नसताना आरोपीने झोपडीत घुसून महिलेवर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे छायाचित्रही काढले. तसेच आवाज केला किंवा कोणाला सांगितलं तर जीवे मारेन, अशी धमकी आरोपीकडून देण्यात आली.

हेही वाचा – नाशिक : समस्यांमुळे राजापूर आरोग्य केंद्रच आजारी; सुधारणा न झाल्यास आशिमा मित्तल यांचा कारवाईचा इशारा

दरम्यान, बुधवारी सकाळी महिलेचा भाऊ जेव्हा तिला चहा द्यायला गेला, तेव्हा तिने घडलेला प्रकार सर्व प्रकार भावाला सांगितला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 08:03 IST

संबंधित बातम्या