scorecardresearch

नाशिक : लाकडी छत अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

जुन्या घराचे लाकडी छत अंगावर पडल्याने वृध्द कामगाराचा मृत्यू झाला.

worker died in nashik, wooden roof fell on worker in nashik, wooden roof of old house
नाशिक : लाकडी छत अंगावर पडून कामगाराचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

नाशिक : जुन्या घराचे लाकडी छत अंगावर पडल्याने वृध्द कामगाराचा मृत्यू झाला. उपनगर येथे बांधकाम सुरू असताना हा प्रकार घडला. जेलरोड येथे अनमोल केडिया यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. मधुकर बोबडे (५९, रा. चांदशी) हे त्या ठिकाणी कामासाठी गेले होते. काम सुरू असताना सकाळी जुन्या घराचे लाकडी छत बोबडे यांच्या अंगावर पडले.

हेही वाचा : “मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा”, एकनाथ खडसे यांची मागणी

policeman-dead
मुंबई: गस्तीवरील पोलिसाचा मृत्यू
man dies while dancing during immersion procession
पुणे:विसर्जन मिरवणुकीत नाचताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
60 year old man, honey bee attack, death due to honey bee attack, farmer death in honey bee attack
मधमाश्यांच्या हल्ल्यात वृध्दाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना
dead,young woman fell into a well and died in nashik
नाशिक: युवतीचा विहिरीत पडून मृत्यू

यामुळे बोबडे यांच्या डोक्याला, पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nashik a worker died after a wooden roof of old house fell on him css

First published on: 21-11-2023 at 17:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×