नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडाल्याने एका मुलीचा आणि ५० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ऐश्वर्या जाधव (१६) ही चांदवड येथील मुलगी शेततळ्याजवळून जात असताना पाय घसरुन शेततळ्यात पडली. नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : धुळ्यात खाणीतील पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

दुसरी घटना त्र्यंबकेश्वर परिसरात घडली. राजाराम शिंदे (रा. शिंदे वस्ती) हे पेगलवाडी फाटा परिसरातील प्रयाग तीर्थ तळ्याजवळ गेले असता पडून ते तळ्यात बुडाले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.