scorecardresearch

Premium

नाशिक : वाढदिवसानिमित्त फटाके फोडून हुल्लडबाजी, चौघांना चोप

शहरात भररस्त्यात, चौकात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले असून बहुसंख्य वेळा असे वाढदिवस एखाद्या गल्लीबोळातील भाई, दादाचे असतात.

nashik four youth beaten up by police, bursting fire crackers on birthday
नाशिक : वाढदिवसानिमित्त फटाके फोडून हुल्लडबाजी, चौघांना चोप (संग्रहित छायाचित्र)

नाशिक : शहरात भररस्त्यात, चौकात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले असून बहुसंख्य वेळा असे वाढदिवस एखाद्या गल्लीबोळातील भाई, दादाचे असतात. अशा वाढदिवसांचा त्रास परिसरातील नागरिकांनाही होत असल्याने पोलिसांकडून अशा प्रकारांची गांभिर्याने दखल घेण्यात येऊ लागली असून अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

हेही वाचा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६३ कोटींचा प्रस्ताव, अवकाळीची ३५ हजार हेक्टवरील पिकांना झळ

Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
A ten year old girl was molested by two old men
संतापजनक! दोन वृद्धांचा दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण
waiting journey for workers
रोहा दिवा मेमू रेल्वेची वेळ बदलल्यामुळे कामगारांना घरी परतण्याचा सव्वातासांचा प्रतिक्षा प्रवास
Sales of houses in Pune
पुण्यात घरांची विक्री जोरात! जाणून घ्या कोणत्या घरांना पुणेकरांची मिळतेय पसंती

रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू नयेत, असा न्यायालयाचा आदेश असताना नाशिकरोड येथील खर्जुल मळा परिसरात भर रस्त्यात शिवाजी गायधनी, शेखर गायधनी (रा. खर्जुल मळा), आकाश जारस (रा. सुभाष रोड), भारत सालकर (रा. गोसावी वाडी) हे केक कापून आरडाओरड करत वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्या हुल्लडबाजीची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही ताब्यात घेतले. यावेळी संशयितांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्यावर पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप देत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, चारही संशयित रुग्णवाहिकेचे चालक आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nashik four youth beaten up by police for bursting fire crackers on during birthday celebration css

First published on: 06-12-2023 at 20:57 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×