नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत सलग दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त झालेल्या उद्योजकांनी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली वीज उपकेंद्र गाठून जाब विचारला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उद्योजकांनी ठिय्या मांडून निषेध नोंदवला. वीज पुरवठ्याअभावी उद्योजकांचे ३०० कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. वीज अधिकाऱ्यांनी उद्योजकांची समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पुढील काळात ही स्थिती उद्भवल्यास उद्योजक एक महिन्याचे देयक भरणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

शहरालगतच्या अंबड औद्योगिक वसाहतीत शेकडो लहान-मोठे उद्योग आहेत. गेल्या आठवड्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित राहिला होता. गुरुवारी कुठलीही पूर्वसूचना न देता दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित राहिला. दुसऱ्या दिवशीही सुधारणा झाली नाही. सकाळी विजेचा लपंडाव सुरू असल्याने वैतागलेल्या उद्योजकांनी वीज कंपनीच्या उपकेंद्रावर धाव घेतली. तिथे कुणी जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलन सुरू केले. नंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उद्योजकांनी संबंधितांना धारेवर धरले.

Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Congress led UDF accuses Kerala government of increasing electricity bills for Adani  benefit
अदानींच्या फायद्यासाठी वीजबिलात वाढ; काँग्रेसप्रणीत ‘यूडीएफ’चा केरळ सरकारवर आरोप
Relaxation in Defence NOC norms for construction .
संरक्षण आस्थापनांशेजारील बांधकामांवरील निर्बंध शिथिल? वस्तुस्थिती काय? आदर्श घोटाळ्याचा काय संबंध?

हेही वाचा : नाशिकमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतुकीविरोधात मोहीम; ९७ प्रकरणांत दोन कोटींचा दंड

आम्ही सर्वाधिक दराने वीज देयक भरतो. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत हे नित्याचेच झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित होत असेल तर आम्ही उद्योग चालवायचे कसे, असा प्रश्न पांचाळ यांनी उपस्थित केला. दोन दिवसांत उद्योजकांचे ३०० कोटीचे नुकसान झाले आहे. ते कोण भरून देणार. उद्योग वसाहतींना प्राधान्यक्रमाने वीज पुरवठा करणे गरजेचे असताना येथील विद्युत पुरवठा खंडित का होतो ,अशी विचारणा त्यांनी केली.

हेही वाचा : कांदाकोंडी वाढली; लिलाव पूर्ववत करण्यास नाशिक जिल्ह्य़ातील व्यापाऱ्यांचा नकार

या प्रकरणाची चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा उद्योजकांनी दिला. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. वीज कंपनीचा गलथानपणा आम्ही खपवून घेणार नाही आणि असा प्रकार घडल्यास आम्ही एक महिन्याचे वीज देयकही भरणार नाही, असा इशारा आयमाच्या ऊर्जा समितीचे प्रमुख रवींद्र झोपे यांनी दिला. पुन्हा असे घडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, कुंदन डरंगे यांच्यासह उद्योजकांनी म्हटले आहे.

हेही वाचा : क्षमता चाचणीला अनुपस्थित आश्रमशाळा शिक्षकांना अजून एक संधी; पुन्हा गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई- आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा

वीज पुरवठा पूर्ववत

महापारेषणच्या अखत्यारीतील उपकेंद्रात तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली. दुरुस्तीचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. या वाहिन्यांचा वीज पुरवठा अन्य वाहिन्यांद्वारे वळवून पूर्ववत करण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे. गुरुवारी सकाळी पाथर्डी विद्युत वाहिनीवरील तांत्रिक बिघाडामुळे महापारेषणच्या उपकेंद्रातील उपकरणे नादुरुस्त झाली. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेन्स व सुमित या वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या उपकेंद्रातून इतर वाहिन्यांवर विद्युत भार वळवून दुपारी हा पुरवठा सुरळीत केला. परंतु महापारेषणच्या अंबड उपकेंद्रात तांत्रिक बिघाडामुळे हा पुरवठा पुन्हा खंडित झाला. तो सायंकाळी पूर्ववत करण्यात आला. शुक्रवारी सकाळी पुन्हा तांत्रिक समस्या उद्भवल्याचे वीज कंपनीने म्हटले आहे.

Story img Loader