नाशिक : केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२- २७ अंतर्गत शालाबाह्य निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याच्या निर्णयासंदर्भात हे अशैक्षणिक काम शिक्षकांना देण्यास येथील माध्यमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना होत असतानाही शिक्षकांना शैक्षणिक अध्यापन सोडून अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. केंद्रस्तरीय अधिकारी, शालार्थ, ऑनलाईन प्रशिक्षण, माध्यमिक मंडळाकडील पेपर तपासणी या कामात शिक्षक व्यस्त आहेत.

सेतूपूर्व आणि सेतू उत्तर चाचणीनंतर आता या कामातून मुक्त होत नाही तोच केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम शासनातर्फे शिक्षकांवर लादण्यात आला आहे. आता कुठे वर्गांमध्ये व्यवस्थितपणे अध्यापन कार्य सुरू होत आहे, तोच अशैक्षणिक शाळाबाह्य कामे शिक्षकांवर लादण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षकांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या आदेशास माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. शिक्षकांमधून देखील या अशैक्षणिक कामांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

Pantnagar municipal higher primary hindi school only two female teachers for classes 5th
घाटकोपरमधील शाळेत ९७ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षिका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
chairperson state women commission rupali chakankar on alandi unauthorized warkari educational institution
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर दोन दिवसांत करवाई करा; राज्य महिला आयोगाच्या सूचना
hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
Teachers unions oppose State Boards decisions with headmasters questioning IAS officers
शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार, आयएएस अधिकाऱ्यांना परीक्षा समजतात काय? शिक्षकांचा थेट सवाल…
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?

हेही वाचा : अंनिसची आता ‘प्रेम व हिंसा’ विषयावर प्रबोधन मोहीम

अशैक्षणिक कामे कमी करून विद्यार्थ्यांच्या अध्यापनात जास्तीत जास्त योगदान देऊन भावी पिढी सक्षमरित्या घडविता यावी, असे शिक्षकांकडून वारंवार सांगितले जात असतानाही अशैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर लादण्यात येतो. नवभारत साक्षरता मोहीम त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आदेश मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदनाचा स्वीकार करतांना शिक्षण उपसंचालकांनी आयुक्तांकडे भावना पोहचवून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

हेही वाचा : घरोघरी मतदार नोंदणीत संथपणा

अन्यथा आंदोलन

शिक्षक संख्येचा अभाव तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होणारा परिणाम तसेच शालेय प्रशासन चालविताना येणाऱ्या अडचणी, याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करावीत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोरवाडी येथील श्रीमान टी. जे. चौहान बिटको विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे यांनी दिला आहे.

Story img Loader