scorecardresearch

Premium

नाशिक : कळवण तालुक्यात शेतीपंप चोरीत वाढ, पाच संशयित ताब्यात

पोलीस ठाण्यात यासंदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेत गुन्हे दाखल होताच पोलिसांनी पाच जणांना अटक करुन मुद्देमाल हस्तगत केला आहे.

farm water pumps, theft cases in kalwan, farm water pumps in kalwan, 5 detained for theft of farm pumps in nashik
कळवण तालुक्यात शेतीपंप चोरीत वाढ, पाच संशयित ताब्यात (संग्रहित छायाचित्र)

नाशिक : कळवण तालुक्यात शेतीपंप चोरीचे प्रकार वाढले आहेत. कळवण पोलीस ठाण्यात यासंदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेत गुन्हे दाखल होताच पोलिसांनी पाच जणांना अटक करुन मुद्देमाल हस्तगत केला आहे. कळवण तालुक्यातील नाकोडा, पाटविहीर, बेजसह परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत शेतीपंप आणि अवजारे, शेतीपयोगी इतर साहित्य चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. नाकोडा येथील शेतकरी गंगाधर गुंजाळ यांच्यासह काही शेतकऱ्यांनी कळवण पोलिसात यासंदर्भात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चोरांच्या तपासणीसाठी प्रयत्न सुरु केले.

हेही वाचा : मधमाश्यांच्या हल्ल्यात वृध्दाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना

beef smuggling in gondia, 2 beef smuggler arrested in gondia, salekasa area beef smuggling
साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात
police crack down on smugglers
गडचिरोली पोलिसांचा तस्करांना दणका
pune ring road, land acquisition for ring road, pune municipal corporation, pune district collector, forceful land acquisition in 13 villages
रिंगरोडसाठी १३ गावांत सक्तीने भूसंपादन, संमतीपत्र देण्याची मुदत संपली
explosives buried by Naxalites Gadchiroli
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त

पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सामील जुनीबेज (ता. कळवण) येथील तुषार पवार (२०), राकेश पवार (२२), अक्षय पवार (२१) यांना ताब्यात घेऊन इलेक्ट्रिक कृषी मोटर, विवेक सहाणे (२१), रवींद्र पवार (१९) यांचेकडून शाळेची जुनी कागदपत्रे, जुन्या पुस्तकांची रद्दी, लोखंड, पत्र्याचे तुकडे, चारा कापण्याचा लोखंडी अडकित्ता, सात लोखंडी अँगल असा १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी निरीक्षक टेभेंकर, उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांसह विठ्ठल बागूल, बोंबले, पंकज शेवाळे, संदिप बागूल, संदिप गांगुर्डे, नितीन वाघमारे, कृष्णा गवळी, अनिल बहिरम यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nashik theft cases of farm water pumps increased in kalwan tehsil 5 detained by police css

First published on: 26-09-2023 at 17:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×