जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योग जगतावरील हल्ला असून त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा तसेच या दिवशी काळ्या फिती आणि काळी मुखपट्टी लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय आयमा कार्यालयात झालेल्या सर्व उद्योग आणि व्यापारी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी आयोजित बैठकीत उद्योजकांच्या विविध घटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करून संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,एनसीएफचे हेमंत राठी, मनीष कोठारी, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आदी उद्योजक उपस्थित होते.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
High Court Takes Note of Petition Against Light Pollution from Tree Decorations in Mumbai sent notice to maharashtra government
झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदुषणासाठी कारणीभूत, उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह मुंबई पालिकेला नोटीस
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

हेही वाचा >>> अवैध वाळू वाहतुकीवरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

निमाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविकात बेळे यांच्या कार्यालयावर कसा भ्याड हल्ला झाला, यामागे कोणकोणत्या शक्ती होत्या त्याची माहिती दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर तपास अतिशय संथ असल्याची भावना बैठकीत उद्योजकांनी व्यक्त केली. आयमाचे अध्यक्ष पांचाळ आणि वरुण तलवार यांनी हा अत्यंत संवेदनशील विषय असून उद्योगांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन केले. हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे, अशी भूमिका राजेंद्र कोठावदे, लोकेश पिचाया यांनी मांडली. धनंजय बेळे सर्वांना मदत करतात. उद्योजकांबाबत कोणतीही घटना घडल्यास त्यांच्या मदतीला ते तातडीने धावून जातात. मग त्यांच्यावर जो प्रसंग उद्भवला, तो निंदनीय असून त्याचा सर्वांनी विविध पद्धतीने निषेध केला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालकमंत्री, विरोधी पक्षनेते आदींना निवेदने पाठविली पाहिजेत, अशी भूमिका हेमंत राठी, शरयू देशमुख, जयप्रकाश जोशी, रोशन देशपांडे, मनीष कोठारी, कल्पना शिंपी, ज्ञानेश्वर गोपाळे, संतोष मंडलेचा यांनी मांडली. हल्लेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे. उद्योजकांची एकजूट दर्शविण्यासाठी दोन जून रोजी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला उद्योजकांची संख्याही लक्षणीय होती. शुक्रवारी उद्योग बंद ठेवले जातील आणि या दिवशी जिल्हा प्रशासनाला काळ्या फिती व काळी मुखपट्टी लावून उद्योजक निवेदन देणार असल्याचे आयमाकडून सांगण्यात आले.

कासवगतीने तपास

या हल्ल्यामागे कोणकोणत्या शक्ती होत्या, याची माहिती बैठकीत दिली गेली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र त्यानंतर चार दिवस उलटूनही पोलीस यंत्रणेकडून कासवगतीने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचा आक्षेप उद्योजकांनी नोंदविला.

भाजप उद्योग आघाडीचा बंदला विरोध

उद्योजकांच्या संघटनांनी बंदचा निर्णय घेतला असताना भाजप उद्योग आघाडीने मात्र बंदला विरोध केला आहे. यासंदर्भात आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी भूमिका मांडली आहे. चुकीच्या माहितीच्या आधारावर जर कोणी उद्योग बंदचा निर्णय घेत असेल तर हे योग्य होणार नाही. वैयक्तिक मान-अपमानातून आणि गैरसमजातून घडलेल्या एखाद्या आंदोलनाचा विपर्यास करून उद्योग जगताला वेठीस धरणे योग्य नव्हे. या विषयातील सर्वच संबंधित आपापसात सामंजस्याने हा विषय सोडवतील. सर्व उद्योजकांना आवाहन आहे की काही चुकीचे घडले असेल तर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.