नाशिक – औद्योगिक विकासासोबतच नाशिक येथे इलेक्ट्रॉनिक क्लस्टर येत्या काळात साकार होणार आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्योजकांसोबत बैठक घेवून जागा निश्चित करावी, अशी सूचना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

सातपूर येथील मैदानात आय.टी.आय. आयोजित निमा पॉवर २०२३ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सामंत यांनी मार्गदर्शन केले. दिंडोरी, घोटी याठिकाणी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेतून मागील सहा महिन्यात १२ हजार ३६० उद्योजक तयार झाले असून या वर्षभरात २५ हजार उद्योजक निर्मितीचे उद्दीष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर निर्मितीमुळे बाहेरील उद्योगही निश्चितच नाशिकमध्ये येतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच

हेही वाचा >>> त्र्यंबकेश्वर प्रकरणी एसआयटी पथकाकडून चौकशीला सुरुवात

शहरात येणाऱ्या उद्योगांमुळे विकासासोबतच पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता उद्योजकांनी घेतली पाहिजे. माथाडी कामगारांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी देखील उद्योजकांनी घेणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यानंतर औद्योगिक विकास करायचा असेल तर आता नाशिकशिवाय पर्याय नाही, असेही सामंत यांनी सांगितले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी निमा पॉवर प्रदर्शनातून इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उद्योजकांना मार्गदर्शन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. नाशिकच्या विकासात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा समूहाचा मोठा वाटा आहे. दिंडोरी, सिन्नर परिसरात उद्योगांसाठी जागा उपलब्ध झाल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध होणार आहे. नाशिकच्या विकासात एक मानबिंदू म्हणून आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत साधारणत: ४०० खाटांचे रुग्णालय आणि १०० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे.

हेही वाचा >>> अखेर उंटांचे नाशिकहून प्रस्थान; दीड महिन्यात राजस्थानला पोहचणार

यासह विद्यार्थिनीसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेशासाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकमध्ये सुरू होत आहे. देशपातळीवर पाच शहरांमध्ये क्वालिटी सिटी म्हणून नाशिक शहराची निवड झाली असून त्यास निमा व उद्योजक यांचा हातभार महत्वाचा असल्याचे भुसे यांनी सांगितले. यावेळी आ. सीमा हिरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र सहसंचालक प्रफुल्ल वाकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.