जिल्ह्यातील आधारतीर्थ आश्रमातील बालकाचा मृत्यू आणि खासगी अनाथ आश्रमातील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने बालकांसाठीच्या संस्थांची माहिती संकलित करण्यात येत आहे. बाल कल्याण समितीच्या वतीने सामाजिक संस्थांची पाहणी करण्यात येणार आहे. धर्मदाय कार्यालयाच्या वतीनेही सामाजिक संस्थाची माहिती संकलित करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक: नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील गाळपेरा भागात पक्ष्यांची गर्दी ;सुविधांअभावी पर्यटकांची पाठ

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधारतीर्थ आश्रम येथे चार वर्षाच्या बालकाचा खून झाल्याचे उघड झाले असताना रासबिहारी लिकंरोड परिसरातील किंग फाऊंडेशन संचलित अनाथ आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर संचालकानेच अत्याचार केल्याचे उघड झाले. यानंतर आश्रमातील इतर पाच मुलींनीही आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>>नाशिक: ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव; येवल्यातील बाधिताच्या प्रकृतित सुधारणा

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने समिती गठीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसरीकडे, जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील लहान बालके, मुली यांच्यासाठी सुरू असलेल्या संस्थांची माहिती संकलित करण्यात येत आहे.दरम्यान, पोलिसांकडून पीडित सहा मुलींची वैद्यकीय तपासणी झाली असून अन्य मुलींसह त्यांना महिलांसाठी असलेल्या वन स्टॉप सेंटर केंद्रात ठेवण्यात आले आहे. संशयित हर्षल मोरे याच्यासह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांची चौकशी सुरू आहे. संशयिताला जास्तीजास्त कठोर शिक्षा व्हावी, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information collection of organizations working for children women child development department alert amy
First published on: 29-11-2022 at 21:18 IST