धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील अमोल भामरे या युवकाच्या खूनाचा अवघ्या २४ तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. मद्यपी मुलाच्या त्रासाला वैतागल्याने आईनेच घराशेजारील व्यक्तीला खूनाची २५ हजार रुपयात सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आईसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सुरगणातील गावे गुजरातला जोडा…राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची मागणी, नंतर सारवासारव

अमोल भामरे (३८, मेहेरगाव, धुळे) याचा मृतदेह गुरुवारी नवलाणे गाव शिवारातील इंग्रजी माध्यम शाळेच्या आवारात संशयास्पदरित्या आढळून आला होता. त्याच्या मानेवर दोरीने फास दिल्याचे व्रण होते. त्यामुळे अमोलचा खून झाल्याची तक्रार त्याचे वडील विश्वास भामरे यांनी सोनगीर पोलिसात दिली होती.

पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशाने अमोलच्या खूनाचा स्थानिक गुन्हा शाखेकडून समांतर तपास सुरु होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना पुंडलिक भामरे (६३, मेहेरगाव) याने अमोलचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुंडलिकला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर खूनाचा उलगडा झाला. अमोलची आई लताबाई भामरे (६२) हिनेच पुंडलिकला अमोलच्या खूनाची २५ हजार रुपयात सुपारी दिल्याचे उघड झाले. पुंडलिकने अमोलला जेवण देण्याच्या बहाण्याने नवलाने गाव शिवारातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात नेले. यावेळी आपल्या दोन साथीदारांनी दोरीने अमोलचा गळा आवळून खून केल्याची कबुली पुंडलिकने दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा- नाशिक ‘पदवीधर’मध्ये कमी मतदारनोंदणी; कमी कालावधी मिळाल्याची राजकीय पक्षांची तक्रार

दारुच्या व्यसनामुळे बळी

अमोलला दारुचे व्यसन होते. अमोलने दारुपायी सुरत येथील बहिणीचा संसारही उदध्वस्त केला होता. त्यामुळे बहीण आणि मेव्हण्याचे निधन झाले. दारुसाठी आई लताबाईलाही तो सतत छळत होता. अमोलच्या व्यसनामुळे शेतीही विकली गेली होती. एके दिवशी घरातील सदस्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. त्याच्या सततच्या पैशांच्या मागणीने घरातील सर्वच सदस्य कंटाळले होते. यामुळे लताबाईने अमोलला संपविण्यासाठी शेजारी वास्तव्यास असलेल्या पुंडलिकला सुपारी दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It was the mother who gave the money to killer for the murder of her drunkards son in dhule dpj
First published on: 02-12-2022 at 19:53 IST