लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: शहरासह जिल्ह्यात १५ आणि १६ मार्च या दोन दिवशी झालेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसामुळे सुमारे ५६२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात गहू, हरभरा, मका आणि ज्वारी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागातर्फे जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

आणखी वाचा- नंदुरबार : १७ तासानंतरही शेतीच्या बांधांवर गारांचा खच -संपामुळे पंचनाम्यांविषयी साशंकता

जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, जामनेर, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा या सात तालुक्यांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सातही तालुक्यांतील ४६ गावांतील ६२६ शेतकरी अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहेत. हरभरा १०७ हेक्टर, गहू ११० हेक्टर, मका १७२ हेक्टर, ज्वारी १४३ हेक्टर आणि केळी २८.५० हेक्टर, असे एकूण ५६२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी विभागातर्फे हा प्राथमिक स्वरूपाचा अहवाल तयार करण्यात आला असून, सद्यःस्थितीत पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon district 562 hectares farm loss due to stormy rains mrj
First published on: 19-03-2023 at 10:51 IST