scorecardresearch

जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिशाजवळ अपघात, सर्वजण सुरक्षित

जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप असून मंगलाबाई पाटील (बळीराम पेठ, जळगाव) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Jalgaon district Pilgrim bus accident
जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिशाजवळ अपघात (प्रातिनिधिक छायाचित्र)

जळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेल्या खासगी बसला ओडिसाच्या सीमेवरील सोहला गावाजवळ रविवारी पहाटे एक वाजता अपघात झाला. अपघातातील जळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत.

जळगाव येथून गुजरातमध्ये नोंदणी असलेल्या गंगोत्री ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमधून आसाम, नेपाळ, गंगासागर जगन्नाथ पुरी, उज्जैन, वाराणसी, कामाख्या देवी या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी ४९ भाविक गेले आहेत. या भाविकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ३१ प्रवासी आहेत. जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप असून मंगलाबाई पाटील (बळीराम पेठ, जळगाव) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हेही वाचा – नाशिक : धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार, चार संशयितांना पोलीस कोठडी

हेही वाचा – “बाळासाहेब थोरातांनीच खरं काय सांगावे,” काँग्रेसमधील वादावर छगन भुजबळ यांचा सल्ला

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबलपूर जिल्हाधिकारी आणि बारलगढ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व अपघातग्रस्तांना मदतीविषयी सूचित केले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने सर्व अपघातग्रस्तांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल केले. यात्रेच्या आयोजक शोभा पाटील (रा. जळगाव) या जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार संबलपूर येथे रवाना झाल्या असून, सर्व यात्रेकरूंना संबलपूर प्रशासनाच्या मदतीने जळगाव येथे सुखरूप आणण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा नियंत्रण कक्ष ०२५७-२२१७१९३ /२२२३१८० अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (९३७३७८९०६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 20:52 IST
ताज्या बातम्या