जळगाव महापालिका आयुक्तपदाचा तिढा अजूनही तीन-चार दिवस लांबणीवर पडला आहे. आयुक्तपदी कोण, याबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) सोमवारी सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल मात्र राखीव ठेवण्यात आला आहे. शासनातर्फे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानक बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी परभणी येथील देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पवार यांनीही दुसऱ्या दिवशी अर्थात ३० डिसेंबर रोजी पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी आयुक्त डॉ. गायकवाड या प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्या होत्या.

हेही वाचा- मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Sarees given on ration by the women of Jawhar returned to the government
साडय़ा नको, शाश्वत रोजगार द्या! जव्हारच्या महिलांकडून रेशनवर दिलेल्या साडय़ा शासनाला परत
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल

कार्यकाळ पूर्ण झाला नसताना आणि कोणतेही सबळ कारण न देता अचानक बदली झाल्याने डॉ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात आव्हान देणारी याचिका दाखल केली. त्यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने डॉ. गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली. मात्र, आयुक्तपदाची सूत्रे पवार यांच्याकडेच ठेवत त्यांना कामाबाबत काही अटी-शर्ती टाकल्या. पवार आणि डॉ. गायकवाड यांच्याकडे कायदेशीर कारभार आहे. मात्र, यातही त्यांना धोरणात्मक कागदपत्रांवर स्वाक्षरी न करण्याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला खीळ बसली आहे.

हेही वाचा- VIDEO : “ए, गई बोला ना…काय पो छो..” म्हणत येवल्यातील पतंगबाजीचा आतषबाजीने समारोप

कायम पदभार देण्याबाबत सुनावणी सुरू होती. त्यावर आजपर्यंत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात सहा वेळा सुनावण्या झाल्या आहेत. सोमवारीदेखील सुनावणी होती. त्यावर निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र, निकाल राखीव ठेवण्यात आला असून, येत्या तीन-चार दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीड महिन्यापासून महापालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून राजकीय हस्तक्षेप वाढल्याने वाद सुरू आहेत.