जळगाव : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई–सांतरागाछी आणि पुणे–सांतरागाछी दरम्यान अतिरिक्त विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या आणि आता सुरु करण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना जळगावसारख्या महत्त्वाच्या जंक्शन स्थानकावर थांबा मात्र देण्यात आलेला नाही. यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस–सांतरागाछी (०४ सेवा) ही विशेष गाडी २४ एप्रिल आणि ०१ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे ००.१५ वाजता सुटेल. आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०० वाजता पोहोचेल. तसेच ०११२८ ही विशेष गाडी २५ एप्रिल आणि ०२ मे रोजी सांतरागाछी येथून दुपारी ०३.०० वाजता सुटेल.
आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ००.५० वाजता पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, आणि खरगपूर या स्थानकावर थांबा असणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस–सांतरागाछी (०४ सेवा)
०१०४१ विशेष गाडी १७ आणि २४ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.५० वाजता सुटेल. आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ०८.३० वाजता पोहोचेल. तसेच ०१०४२ विशेष गाडी १९ आणि २६ एप्रिल रोजी सांतरागाछी येथून ०५.३० वाजता सुटेल. आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, आणि खरगपूर या स्थानकांवर थांबा असेल.
पुणे–सांतरागाछी विशेष (०४ सेवा)
०१४२९ विशेष गाडी १५ आणि २२ एप्रिल रोजी पुणे येथून १०.०० वाजता सुटेल. आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ०९.०० वाजता पोहोचेल. ०१४३० विशेष गाडी १७ आणि २४ एप्रिल रोजी सांतरागाछी येथून दुपारी ०३.४५ वाजता सुटेल. आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०५.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर या स्थानकांवर थांबा असणार आहे.
पुणे–सांतरागाछी विशेष (०४ सेवा)
०१४४१ विशेष गाडी १७ आणि २५ एप्रिल रोजी पुणे येथून १०.०० वाजता सुटेल. आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ०९.०० वाजता पोहोचेल. ०१४४२ विशेष गाडी १९ आणि २७ एप्रिल रोजी सांतरागाछी येथून दुपारी ०३.४५ वाजता सुटेल. आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०५.१५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर स्थानकांवर थांबा असणार आहे.
