scorecardresearch

चकाकी करुन देण्याच्या नावाखाली दोन लाखाचे दागिने लंपास

दोन लाख, ४० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार दिंडोरी परिसरात उघडकीस आला आहे.

चकाकी करुन देण्याच्या नावाखाली दोन लाखाचे दागिने लंपास
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता

नाशिक: सोन्याच्या दागिन्यांना चकाकी करून देतो, अशी बतावणी करीत दोन लाख, ४० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार दिंडोरी परिसरात उघडकीस आला असून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी येथील शैला देशमुख (६२) या घरी एकट्या असतांना दोन संशयित त्या ठिकाणी आले. सोन्याचे दागिने चकाकी करून देतो, असे सांगत देशमुख यांच्याकडील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र, दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी-पाटली, सहा ग्रॅम वजनाचे कानातील दागिने असे दोन लाख ४० हजार रुपयांचे दागिने देशमुख यांचा विश्वास संपादन करत ताब्यात घेतले. दागिने परत न देता लंपास केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या