आतापर्यंत ७६८ जणांची नोंदणी

नाशिक शहर व ग्रामीण पोलीस आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्यातर्फे २ जून रोजी  आजी-माजी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी कौशल्य, उद्योजकता विकास आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी १४ नामांकित कंपन्यांमधील १८५ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची चाचणी व मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.  शहरातील ७६८ पाल्यांनी नोंदणी केली आहे.  या बाबतची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

पोलीस व शासकीय विभागांच्या सहकार्याने पोलीस पाल्यांसाठी होणारा या स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे. शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी वा रोजगारापासून वंचित राहणाऱ्या युवा वर्गाची संख्या मोठी आहे. त्यापासून पोलीस दलात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पाल्यही अपवाद नाहीत. ही बाब लक्षात घेऊन या अनोख्या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली.

रोजगार मेळाव्यात अर्हता निहाय नोकरीची संधी आहेच, शिवाय ज्यांना स्वयंरोजगार करण्याची इच्छा आहे त्यांना मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस मुख्यालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत हा मेळावा होईल. मेळाव्यात नाशिक शहरातील ६४२ तर परिक्षेत्रातून १२५ अशा अशा एकूण ७६८ पाल्यांनी नोंदणी केली आहे.

या संधीचा आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंगल यांनी केले. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येताना इच्छुक मुले, मुली व पत्नी यांनी पाच प्रतीत वैयक्तिक माहिती, छायाचित्र, आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. नोंदणी केली नसल्यास संबंधितांनी ‘आरओजेएआर.एमएएचएएसडब्लूएवायएएम.आयएन’ या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन सिंगल आणि कौशल्य विकासचे साहाय्यक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

१८५ रिक्त पदे आणि कौशल्य प्रशिक्षण

मेळाव्यात रोठे एरडे इंडिया, डब्लूएनएस ग्लोबल सव्‍‌र्हिसेस, इनोव्हा रबर, अ‍ॅक्सेस कॅड, डेटामॅट्रिक ग्लोबल सव्‍‌र्हिस, साई इन्फोकॉर्प सोल्युशन्स असे एकूण १४ कंपन्या सहभागी होणार आहेत. या कारखान्यांमधील १८५ रिक्त पदांची भरती उमेदवारांची चाचणी व मुलाखती घेऊन करण्यात येईल. शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबवीत आहे. त्या अंतर्गत ब्युटिकल्चर अ‍ॅण्ड हेअर ड्रेसिंग, गारमेंट, कृषी, प्लास्टिक प्रक्रिया, बँकिंग व अकौटिंग, उत्पादन, इलेक्ट्रिकल आदी क्षेत्रातील रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. मेळाव्यात शासनाच्या विविध महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. संबंधितांच्या कक्षात नोंदणी करून मार्गदर्शन मिळेल.