नाशिक – इगतपुरी तालुक्यातील श्री कपिलधारा तीर्थ हे देखील सिंहस्थाचे एक मूळ स्थान आहे. त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कृती आराखड्यात श्री कपिलधारा तीर्थ आणि परिसरातील कामांचाही समावेश करावा, अशी मागणी श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा >>> भियांत्रिकीला स्वायत्तता की शिक्षण संस्थेचे विद्यापीठात रुपांतर; मविप्र शिक्षण संस्थेसमोर पेच

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

या संदर्भातील निवेदन आश्रमाचे महंत रामनारायणदास महाराज आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिले. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. पुरातून काळापासून या दोन्ही ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही स्नानाचे आयोजन केले जाते. या कुंभमेळ्यात देश, विदेशातून संत, महंत व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील श्री कपिलधारा तीर्थ हे देखील एक सिंहस्थाचे मूळ स्थान असल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचा >>> नाशिक : नव्या उपविभागाचा वादग्रस्त अधिकाऱ्याकडे कार्यभार ;  ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सावळागोंध

या तीर्थास पुरातून काळापासून अनेक संतांनी भेटी दिल्या आहेत. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र शासनाकडून आवश्यक असलेल्या कामांचा कृती आराखडा तयार केला जातो. या कृती आराखड्यात त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील कामांचा समावेश केला जातो. श्री कपिलधारा तीर्थ हे देखील सिंहस्थाचे मूळ स्थान असल्याने २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कृती आराखड्यात येथील कामांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. कपिलधारा तीर्थालगत श्रीराम मंदिर शुक्ल तीर्थ असल्याने या स्थळास भेट देण्यासाठी साधू, महंत, भाविक येतात. त्यामुळे या परिसरातील कामांचाही समावेशाचा आग्रह धरला गेला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी होणाऱ्या बैठकांमध्ये येथील प्रमुख महंतांनाही निमंत्रित करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना देण्याची मागणी करण्यात आली आहे.