गुंतवणूकदारांना कोटय़वधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांनी बँक लॉकरमध्ये दडविलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी तपास यंत्रणाही चकीत झाली आहे. सोमवारी संबंधितांच्या एका लॉकरमध्ये पुन्हा पाच किलो ३०० ग्रॅम सोने आढळून आले. आतापर्यंत संबंधितांच्या वेगवेगळ्या लॉकरमधून एकूण सुमारे १४ किलो सोन्याची सोन्याची नाणी व दागिने तसेच सव्वा दोन किलो चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या.

अडीच ते तीन वर्षांत गुंतवणूक दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवत राज्यभरातील हजारो गुंतवणुकदारांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य संशयित भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने आधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत पुन्हा वाढविण्यात आली.

panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

तपास यंत्रणा भाऊसाहेब व पत्नीच्या नावावर वेगवेगळ्या बँकांमध्ये असणाऱ्या लॉकरची छाननी करत आहे. त्यात सोमवारी एका लॉकरमध्ये काही आढळून आले नाही परंतु एका लॉकरमध्ये पाच किलो ३०० ग्रॅम सोने आढळून आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. त्याची किंमत एक कोटी ५९ लाख रुपये आहे.