‘गई बोला रे धिना.. काट्टा दे ढिल..’ अशा आरोळ्यांना डी. जे. साऊंड सिस्टीम अन् ढोल व थाळीनादाच्या लाभलेल्या साथीने परस्परांवर कुरघोडी करण्याच्या घोषणांनी दणाणून गेलेल्या वातावरणात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पतंग शौकिनांनी संक्रांत हा नववर्षांतील पहिला सण अभूतपूर्व अशा उत्साहात साजरा केला. नायलॉन व चिनी धाग्याचा वापर रोखण्यासाठी पोलिसांनी इमारतींवर पाहणी करत काही जणांवर कारवाई केली. दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधण्याची धडपड केली.

गुजरातचे नजीकचे सान्निध्य असल्याने पहिल्यापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये संक्रांतीला पतंगोत्सवाचे मोठे महत्त्व आहे. शनिवारी खास माहौलमध्ये ठिकठिकाणी गच्चीवर, मैदानांमध्ये गटागटाने जमलेल्या मंडळींनी पतंगोत्सवाचा आनंद लुटला. या निमित्ताने संपूर्ण वातावरण पतंगमय झाले. सर्वाच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. केवळ बालगोपाळच नव्हे तर, आबालवृद्ध व थोरा-मोठय़ांसह महिलांनीही पतंगोत्सवाचा आनंद लुटल्याचे पाहावयास मिळाले. बहुतांश पतंगशौकीन पतंग उडविण्यात दंग असताना काही युवक कटलेले पतंग पकडण्यासाठी धावत होती. सकाळी गच्चीवर गेलेले तरुणांचे जत्थे सायंकाळी अंधार होईपर्यंत पतंग उडविण्यात दंग होते. अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी पतंग उडविण्याऐवजी काही तरुणांनी मोकळ्या वातावरणात पतंग उडविण्याचा आनंद लुटला. या शिवाय, ठिकठिकाणच्या इमारतींच्या गच्चीवर गटागटाने जमून डीजेच्या तालावर पतंग उडविण्यात सारेच मग्न असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दुसऱ्याची पतंग काटल्यावर जसा जल्लोश होत होता, तसा आपली पतंग कटल्यावर हर्षेने दुसरी पतंग बढविण्याची कसरत सुरू होती. एकमेकांच्या पतंग काटण्यासाठी दिवसभर प्रयत्न केले जात होते. धुळे, जळगावमध्येही अशाच उत्साहात पतंगोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी लगबग सुरू झाली ती तिळगूळ वाटपाची. रात्री उशिरापर्यंत सहकुटुंब तिळगुळासह शुभेच्छा देण्याचे काम सुरू होते.

Ajit pawar explaination on controversial statement
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”
Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”