scorecardresearch

Premium

नाशिक : नानेगावजवळ बिबट्या जेरबंद

देवळाली कॅम्पजवळील नानेगाव येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी बिबट्या जेरबंद झाला.

Leopard caught near Nanegaon
नाशिक : नानेगावजवळ बिबट्या जेरबंद (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक – देवळाली कॅम्पजवळील नानेगाव येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी बिबट्या जेरबंद झाला. नानेगावातील भवानी नगरमधील मनोहर शिंदे यांच्या शेतात बिबट्या आठवडाभर मुक्तपणे फिरत होता. बिबट्या वारंवार दिसत असल्याने परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती. सर्वांनाच जीव मुठीत घेवून काम करावे लागत होते.

हेही वाचा – नाशिकमध्ये मायटेक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या तयारीला वेग, महाराष्ट्र चेंबरचा पुढाकार, तीनशेपेक्षा अधिक दालनांची व्यवस्था

tobacco Ballarpur toll booth
चंद्रपूर : तब्बल १ कोटी ११ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, ‘या’ तंबाखू तस्कराचे नाव चर्चेत
priority to refill well
पावसाने ओढ दिल्याने आता विहीर पुनर्भरणाला प्राधान्य; ‘एवढ्या’ विहीरींची कामे पूर्ण
Marbat Badge , Marbat Badge procession in gondiya , heavy rain in Gondia
गोंदियात मुसळधार पाऊस; रस्ते बंद; मारबत-बडगे मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण
ten foot long python swallowed alive cat in chirner
अजगराने जिवंत मांजर गिळली; लोकवस्ती शिरलेल्या अजगरला सर्प मित्रांकडून जीवदान

हेही वाचा – नाशिक : ओबीसी हक्कांसाठी आता समता परिषद मैदानात, उत्तर महाराष्ट्रात मेळावे घेण्याची घोषणा

वन विभागाला या विषयी माहिती दिली असता अधिकारी अनिल अहिरराव आणि सहकाऱ्यांनी शिंदे यांच्या पडीक जागेवर पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला. मंगळवारी पहाटे पिंजऱ्याच्या दिशेने बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येऊ लागला. शिंदे यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आठ ते नऊ वर्षांचा नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून त्याला सुरक्षितरित्या गंगापूर येथील रोप वाटिकेत उपचारासाठी नेण्यात आले आहे. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leopard caught near nanegaon ssb

First published on: 03-10-2023 at 17:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×